Maruti Suzuki: प्रीमियम हॅचबॅक कारच्या सर्व मॉडेल्सच्या किमती एका क्लिकवर, जाणून घ्या मायलेज आणि फीचर्स

मारूति सुझुकीच्या गाड्यांची सर्वाधिक विक्री भारतात होते.  तुम्ही कमी किमतीत प्रीमियम हॅचबॅक कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मारुती सुझुकी इग्निस हा चांगला पर्याय असू शकतो. मारुती सुझुकी इग्निसची प्रीमियम डीलरशिप Nexa वरून विक्री करते. या गाडीची किंमत 5.35 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.72 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

Updated: Oct 17, 2022, 04:48 PM IST
Maruti Suzuki: प्रीमियम हॅचबॅक कारच्या सर्व मॉडेल्सच्या किमती एका क्लिकवर, जाणून घ्या मायलेज आणि फीचर्स title=

Maruti Suzuki Ignis Price & Features: मारूति सुझुकीच्या गाड्यांची सर्वाधिक विक्री भारतात होते.  तुम्ही कमी किमतीत प्रीमियम हॅचबॅक कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मारुती सुझुकी इग्निस हा चांगला पर्याय असू शकतो. मारुती सुझुकी इग्निसची प्रीमियम डीलरशिप Nexa वरून विक्री करते. या गाडीची किंमत 5.35 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.72 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. या महिन्यात या गाडीवर विशेष सूट देण्यात असून 30,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या गाडीच्या फीचर्स आणि सर्व प्रकारांच्या किमतींबद्दल जाणून घेऊयात.

ही 5 सीटर कार सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा या चार ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध आहे. इग्निसला 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 83 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचा पर्याय आहे. ही गाडी 20Km पेक्षा जास्त मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. 

कारमध्ये डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प, पुडल लॅम्प, अलॉय व्हील्स, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो एसी आणि मागील पार्किंग कॅमेरा यांसारखे फीचर्स आहेत. या गाडीची स्पर्धा महिंद्रा KUV100, Hyundai Grand i10 Nios आणि मारुती स्विफ्ट सारख्या कारशी आहे.

जगातील पहिली Solar Electric कार लाँच, पूर्ण चार्ज झाल्यानंतर कापणार 700 किमी अंतर, किंमत जाणून घ्या

मारुती सुझुकी इग्निसच्या सर्व प्रकारांच्या किमती

  • मारुती इग्निस सिग्मा मॅन्युअल - 5.35 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली)
  • मारुती इग्निस डेल्टा मॅन्युअल - 5.99 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली)
  • मारुती इग्निस झेटा मॅन्युअल- 6.47 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली)
  • मारुती इग्निस डेल्टा AMT -  6.49 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली)
  • मारुती इग्निस झेटा AMT - रु. 6.97 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली)
  • मारुती इग्निस अल्फा मॅन्युअल- 7.22 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली)
  • मारुती इग्निस अल्फा AMT - 7.72 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली)