मुंबई : Mobile Camera Facts: आज स्मार्टफोनचे युग आहे. आजच्या बदलत्या युगात मोबाईल फोन बरेच अपडेट झाले आहेत. ज्या मोबाईलचा वापर एकमेकांशी बोलण्यासाठी केला जात होता, आज तो मोबाईल लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. अनेक महत्त्वाची कामे मोबाईलवरुनच केली जात आहेत. यासोबतच मोबाईल हे मनोरंजनाचेही साधनही झाले आहे. जर तुमच्याकडेही स्मार्टफोन असेल तर त्याचा कॅमेरा डाव्या बाजूला असेल हे तुमच्या लक्षात आले असेल. बहुतेक मोबाईल फोन्समध्ये कॅमेरा फक्त डाव्या बाजूला बसवला जातो. पण यामागे काय कारण आहे, याचा कधी विचार केला आहे का? अधिक जाणून घ्या.
ज्यावेळी स्मार्टफोन बाजारात दाखल झाले त्यावेळी कॅमेरे हे मध्यभागी होते. परंतु नंतर हळूहळू हे कॅमेरे मोबाइलच्या डाव्या बाजूला येऊ लागले. त्याची सुरुवात प्रथम आयफोनने केली होती. यानंतर बहुतांश कंपन्यांनी बाजूला कॅमेरे देण्यास सुरुवात केली.
कॅमेरा डाव्या बाजूला असण्यामागचं कारण मोबाईलचं डिझाईन नसून आणखी काही कारण आहे. बहुतेक लोक डाव्या हाताने मोबाईल वापरतात. अशा स्थितीत डाव्या बाजूला असलेल्या कॅमेऱ्याने फोटो किंवा व्हिडीओ शूट करणे सोपे जाते. याशिवाय आपण कॅमेरा फिरवून लँडस्केप करतो, तेव्हा मोबाईलचा कॅमेरा वरच्या दिशेने येतो, ज्यामुळे आपण सहजपणे लँडस्केप फोटो घेऊ शकतो. यासाठी मोबाईलच्या डाव्या बाजूला कॅमेरे बसवले जातात.
या व्यतिरिक्त, आपण पाहिले असेल की जेव्हा आपण फ्रंट कॅमेरासह सेल्फी घेतो तेव्हा तो उलटा येतो. म्हणजेच, त्याची स्थिती डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे होते. अशा परिस्थितीत, असे होते की आपल्या सेल्फीमध्ये लिहिलेले नाव उलट होते किंवा दिसते. बहुतेक मोबाईलमध्ये ही समस्या असते. वास्तविक, बहुतेक मोबाईलमधील सेल्फी कॅमेरामध्ये मिरर इफेक्ट असतो. याच कारणामुळे जेव्हा कोणी सेल्फी घेतो तेव्हा तो कॅमेऱ्यात सरळ दिसतो, पण फोटो काढल्यानंतर उलटा होतो.