मुंबई : नोकिया फोन ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण नोकिया आणखी स्वस्त फोन बाजारात आणणार आहे. कधीकाळी नोकियांने मोबाईल जगतात अधिराज्य गाजवलं होतं, हे अजून कुणीही विसरलेलं नाही, त्याआधीच नोकियाने यावर्षी बाजारात पुन्हा पुनरागमन केलं आहे.
अँड्राईड फोन्सचं वर्चस्व वाढल्यानंतर नोकियाला जबर फटका बसला होता. मात्र या वर्षी नोकियानं 'नोकिया ३', 'नोकिया ५', 'नोकिया ६' आणि '३३१०' लाँच करण्यात आला. बाजारात पुन्हा जम बसवण्याचा हा प्रयत्न होता. याचसाठी नोकिया ३३१० पुन्हा लॉन्च करण्यात आला आहे.
नोकिया ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इव्हेंटमध्ये आपला नवा स्मार्ट फोन लाँच करणार आहे. आता आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याच्या नोकिया तयारीत आहे.
या फोनची किंमत साधरण सहा ते साडेसहा हजारा पर्यंत असण्याची आहे. या मॉडेलचे नाव 'नोकिया २' असण्याची शक्यता आहे. 'नोकिया २' हा 'नोकिया ३' पेक्षा खूप स्वस्त असेल असंही म्हटलं जात आहे.
८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असे फीचर्स फोनमध्ये असतील. त्याचप्रमाणे ४.७ ते ५ इंच डिस्प्ले, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल स्टोअरेज या फोनमध्ये असणार आहे.