मुंबई : बँक अकाऊंट, मोबाइल नंबर बरोबरच आता सरकारी कामात आधार नंबर महत्वाचा ठरत आहे. मात्र
आता तुम्हाला अगदी ऑनलाईन शॉपिंग जरी करायची असली तरी तुम्हाला आधार नंबर आवश्यक आहे. तुम्हाला या वाक्यावर विश्वास बसणार नाही पण ही माहिती १०० टक्के खरी आहे. आता
देशात ऑनलाईन सेवा देणाऱ्या सर्व कंपन्या देखील ग्राहकांना आधार नंबरशी लिंक होण्याचे अपील करत आहे. यासोबतच ई - कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने ग्राहकांना १२ नंबरच्या युनिक आधार नंबरची डिटेल वेबसाइटवर अपलोड करायला सांगितले आहे.
अॅमेझॉनसोबतच कार रेंटल प्लॅटफॉर्म झूमकारने देखील आपल्या ग्राहकांना ओळखपत्र म्हणून आधार नंबरची मागणी केली आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना आधार नंबरची माहिती वेबसाईटवर अपलोड करण्यास सांगितली आहे. झूमकारने आधार नंबरशिवाय बुकिंग घेण्यास बंद केलं आहे. या नव्या व्यवस्थेला सुरू करण्यासाठी आधार लिंक महत्वाचा आहे. आधार नंबरवरून ग्राहकांचे हरवलेले सामान ट्रॅक करणं सोपं जाईल.
झूमकार आधार नंबरवरच कार विकण्याचा निर्णय घेत आहे. भारतात अनेक ठिकाणी आधार नंबरच्या आधारावरच बुकिंग केलं जात आहे. कंपनी जून महिन्यापासून आधार डिटेल शेअर करण्यावर जोर देत आहे. आता एका महिन्यात हा नियम सर्व युझर्स लागू करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.