मोबाईलमधली वैयक्तिक माहिती चोरल्याचा वनप्लसवर आरोप

ग्राहकाच्या मोबाईलमधली वैयक्तिक माहिती चोरल्याचा आरोप वनप्लस या स्मार्टफोन कंपनीवर होत आहे.

Updated: Oct 11, 2017, 09:01 PM IST
मोबाईलमधली वैयक्तिक माहिती चोरल्याचा वनप्लसवर आरोप  title=

मुंबई : ग्राहकाच्या मोबाईलमधली वैयक्तिक माहिती चोरल्याचा आरोप वनप्लस या स्मार्टफोन कंपनीवर होत आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर क्रिस्टोफर मूर यांनी वनप्लस या कंपनीवर हे खळबळजनक आरोप केले आहेत. वनप्लस ही मोबईल कंपनी ग्राहकाचा आयएमईआय, फोन नंबर्स, मॅक अॅड्रेस, मोबाईल नेटवर्कचं नाव, फोनचा सीरियल नंबर, वायरेलस नेटवर्कचं ESSID आणि BSSID चोरत असल्याचा आरोप होत आहे.

या आरोपांवर वनप्लस कंपनीनं प्रतिक्रिया दिली आहे. ही माहिती आम्ही मोबाईलचं सॉफ्टवेअर आणखी ग्राहकांच्या आणखी सोयीचं करण्यासाठी वापरत असल्याचं वनप्लसनं सांगितलं आहे. तसंच  ‘Settings’ -> ‘Advanced’ -> ‘Join user experience program’मध्ये जाऊन ही अॅक्टिव्हिटी टर्न ऑफ करता येणार असल्याचं वनप्लसनं सांगितलं आहे.