अजब ! ओप्पोच्या या फोनमध्ये २५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

चायनीज मोबाईल निर्माता कंपनी ओप्पोने प्रीमियम स्मार्टफोन OPPO F9 Pro २१ ऑगस्टला भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे. दरम्यान, या स्मार्टफोनचे फोटो लॉन्च होण्याआधीच लिक झालेत. दरम्यान, या ओप्पोबद्दल अधिकृत माहिती नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 11, 2018, 09:57 PM IST
अजब ! ओप्पोच्या या फोनमध्ये २५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा title=

मुंबई : भारतीय बाजारपेठेत २१ ऑगस्ट रोजी चीनी मोबाइल कंपनी ओप्पो एफ ९ प्रो लॉन्च करणार आहे. यासाठी, प्रीबुकींग सुरु करण्यात आली आहे. या स्मार्टफोनचे फोटो लॉन्च होण्याआधीच लिक झालेत. या कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

oppo f9 pro to launch with 25 mega pixel camera on 21 august know the features

सॅमसंगने नुकताच गॅलेक्सी नोट ९ हा आपला नवा स्मार्टफोन बाजारात आणलाय. त्यानंतर ओप्पोने २५ सेल्फीचा फोन बाजारात आणण्याची तयारी पूर्ण केलेय. तो २१ ऑगस्टला लॉन्च करण्यात येणार आहे. पहिल्यांना हा फोन १५ ऑगस्ट रोजी व्हिएतनाम येथील बाजारात आणला जाईल.  ओप्पो एफ-९ प्रो हा ६.३ इंच संपूर्ण एचडी असून यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीचे अंतर्गत स्टोरेज आहे.

oppo f9 pro to launch with 25 mega pixel camera on 21 august know the features

हा फोन सनराइज रेड, ट्विलाइट ब्लू आणि स्टॅरी पर्पल कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च केला जाणार आहे. विशेष वैशिष्ट्ये म्हणजे VOOC फास्ट चार्जिंग चा यात पर्याय आहे. या फोनमध्ये पी ६० प्रोसेसर असून फोनमध्ये ३५०० एमएएचची मजबूत बॅटरी आहे, जी जलद चार्जिंगला सपोर्ट करेल.

oppo f9 pro to launch with 25 mega pixel camera on 21 august know the features

या फोनमध्ये सेल्फीसाठी २५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ड्युअल कॅमेरा सेटअपमधील प्रायमरी कॅमेरा १६ एमपी आहे आणि दुय्यम कॅमेरा २ एमपी आहे.

oppo f9 pro to launch with 25 mega pixel camera on 21 august know the features

भारतीय बाजारपेठेत या फोनची किंमत अद्याप माहिती नाही. तथापि, व्हिएतनाममध्ये एफ ९ ची किंमत ७, ९९०,००० डॉलर म्हणजे सुमारे २३,५०० भारतीय रुपये आहे. व्हिएतनाममधील फोनसाठी, पूर्व-बुकिंग १५ ऑगस्टपासून सुरू होईल. प्री-बुकिंग करणाऱ्यांना १० हजार एमएएच पॉवरबँक ऑफर सोबत मिळेल.