close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

OPPOकडून ४८ मेगापिक्सल असणारा नवा स्मार्टफोन लॉन्च

जाणून घ्या काय आहेत फिचर्स...

Updated: Sep 21, 2019, 01:35 PM IST
OPPOकडून ४८ मेगापिक्सल असणारा नवा स्मार्टफोन लॉन्च

मुंबई : आजकाल प्रत्येक स्मार्टफोन कंपनी कॅमेरा तंत्रज्ञानाच्या बाबतीत एकमेकांना चांगलीच टक्कर देताना दिसतात. सेल्फीच्या या जमान्यात कोणत्याही स्मार्टफोनची लोकप्रियता अनेकदा फोनच्या कॅमेरावरुन ठरताना दिसते. अशातच ओप्पो OPPO आपल्या कॅमेरा टेक्नोलॉजीमध्ये सतत काही ना काही इनोव्हेशन करत आहेत. नुकताच OPPOने A9 2020 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनसह कंपनीने ग्राहकांसाठी जबरदस्त कॅमेराही आणला आहे.

विविध शूटिंग अॅन्गलसाठी, गरजेनुसार, A9 2020मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप (४८ MP + ८ MP + २ MP + २ MP) देण्यात आला आहे. फोनमध्ये अनेक आर्टिस्टिक पोर्टेट स्टाइलही देण्यात आल्या आहेत. 

अल्ट्रा नाइट मोड २.० च्या मदतीने हा फोनने कमी उजेडातही क्लियर फोटो घेता येऊ शकतो. फोनमधील इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन (EIS) या फिचरद्वारे, धावताना, खेळताना, डान्स करतानाही क्लियर फोटो आणि व्हिडिओ काढता येऊ शकतो.

 A9 2020 या स्मार्टफोनमध्ये ५०००mAh बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीच्या मदतीने फोन सतत २० तासांपर्यंत वापरला जाऊ शकत असल्याचं बोललं जात आहे. फोनमध्ये व्हिडिओ आणि गेमिंगसाठी डुअल स्टिरिओ स्पिकर्स आणि डॉल्बी एटमॉस साउंड इफेक्ट देण्यात आला आहे. 

OPPO A9 2020 स्मार्टफोन ८ जीबी रॅम, १२८ जीबी रॉम आणि ४ जीबी रॅम, १२८ जीबी रॉम अशा दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 

A9 2020 स्मार्टफोनच्या ८ जीबीची किंमत १९ हजार ९९० रुपये आहे. तर ४ जीबी स्मार्टफोनची किंमत १६ हजार ९९० रुपये इतकी आहे.

A9 2020चा ऑनलाइन सेल अॅमेझॉनवर १६ सप्टेंबर तर ऑफलाइन १९ सप्टेंबरपासून सुरु झाला आहे. 

ओप्पोने ग्राहकांसाठी A9 2020 स्मार्टफोनसह A5 2020 देखील लॉन्च केला आहे. A5 2020 मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ MP  प्रायमरी रियर कॅमेरा + ८ MP अल्ट्रा-वाइड फ्रन्ट कॅमेरा + २ MP मोनो लेन्स + २ MP पोर्ट्रेट लेन्स देण्यात आला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी रॉम स्टोरेज आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी देण्यात आला आहे. A5 2020 १३ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. A5 2020 चा ऑनलाइन आणि ऑफलाइन सेल २१ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.