पॅनासॉनिक पी ७७ चे स्टोरेज वाढले, किंमतही झाली कमी

या फोनचे स्टोरेज वाढविण्यात आले असून त्याचे मूल्य कमी करण्यात आले आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 1, 2017, 03:45 PM IST
पॅनासॉनिक पी ७७ चे स्टोरेज वाढले, किंमतही झाली कमी  title=

मुंबई : गेल्या वर्षी ६,९९० रूपयात पॅनासॉनिक पी ७७ स्मार्टफोन मॉडेल ग्राहकांना मिळाले. या फोनला वर्षभर बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. यामध्ये ८ जीबी इनबिल्ट स्टोरेज होते. पण आता हा  पॅनासोनिक पी ७७ नव्या ढंगात, नव्या रुपात पुन्हा एकदा आला आहे.

नवा पॅनासोनिक पी ७७  व्हाईट आणि ग्रे या दोन रंगांमध्ये आला आहे. या फोनचे स्टोअरेज वाढविण्यात आले असून त्याचे मूल्य कमी करण्यात आले आहे. पॅनासॉनिक पी ७७ या मॉडेलमधील उर्वरित फिचर्स आधीप्रमाणेच आहेत. अर्थात पॅनासोनिक पी ७७ हा स्मार्टफोन ड्युअल सीमकार्डला सपोर्ट करणारा आहे.

यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील देण्यात आला आहे. 

नव्या फिचर्ससह हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना उपलब्ध होत आहे.

किती आहे किंमत ?

आता पॅनासोनिक पी ७७ हा स्मार्टफोन ५,२९९ रूपये किंमतीत ग्राहकांना मिळणार आहे.

कुठे मिळेल ?

ग्राहकांना हा स्मार्टफोन फक्त फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

काय आहेत खास फिचर्स

पाच इंच आकाराचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले
१ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसर
एक जीबी रॅम
१६ जीबी इनबिल्ट स्टोअरेज  ३२ जीबी एक्स्पांडेबल
८ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे
अँड्रॉईड लॉलिपॉप प्रणाली
२,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी