स्मार्टवॉच आता तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत,,,

2000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करू शकता स्मार्टवॉच  

Updated: Jul 22, 2022, 05:44 PM IST
स्मार्टवॉच आता तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत,,, title=

Pocketfriendly smartwatch in india:  स्मार्टफोनच्या जमान्यात सर्वकाही स्मार्ट वापरण्याची सवय आपल्याला झालेय, स्मार्ट वॉच वापरणं कोणाला आवडणार नाही? मात्र बऱ्याच वेळा आपण स्मार्ट वॉच खरेदी करायला जातो पण त्याची किंमत ऐकून माघारी परत येतो पण आता काळजी करण्याचं कारण नाही कारण तुमच्या खिशाला परवडेल इतक्या स्वस्त किंमतीत स्मार्ट फोनचे पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहे
  
स्मार्टवॉचच्या बाजारपेठेत Noise, boAt, Realme, Boult, Fire Bolt यासारख्या कंपन्यांचे स्मार्टवॉच आता तुम्ही परवडणाऱ्या किमतीत चांगली  खरेदी करू शकता. आज आपण 2000 रुपये किमतीच्या स्मार्टवॉचबद्दल बोलणार आहोत. चला तर मग बघूया  2000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टवॉचवर एक नजर टाकुयात...

नॉइज कलरफिट पल्स ग्रँड(noise colorfit pulse grand)

नॉईज कलरफिट पल्स ग्रँड हे पल्स सीरिजमधील ऍडव्हान्स डिवाईस आहे.  यात 1.69 इंचाचा मोठा डिस्प्ले आहे शिवाय ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, Sp2 सेन्सर आहे.या स्मार्टवॉचची किंमत 1799 रुपये आहे.

 

बोल्ट कॉस्मिक (BoAt Wave Lite)

या स्मार्टवॉचमध्ये 240x280 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.69-इंच TFT डिस्प्ले आहे. जो 500nits पीक ब्राइटनेस आणि 70 टक्के RGB कलर गॅमट देतो.. हे तुमच्या झोपण्याच्या पद्धतीचा तसेच SpO2 देखील ट्रॅक करू शकते.यात तुम्हाला 10 स्पोर्ट्स मोड मिळतात.  यामध्ये फुटबॉल, योगा, सायकलिंग, चालणे, बॅडमिंटन, चालणे, धावणे, बास्केटबॉल, स्किपिंग, क्लाइंबिंग आणि पोहणे यांचा समावेश आहे.या स्मार्टवॉचची किंमत भारतात 1999 रुपये इतकी आहे.

 

 फायर-बोल्ट निन्जा 3 स्मार्टवॉच (fire-bolt ninja3)

या स्मार्टवॉचमध्ये 1.69-इंचाचा डिस्प्ले आहे.या स्मार्टवॉचमध्ये रिअल टाइम  SPO2 / ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंग, डायनॅमिक हार्ट रेट मॉनिटरिंग यांसारखे आरोग्य वैशिष्ट्यांसह येते.फायर बोल्ट निन्जा 3 स्मार्टवॉच सध्या Amazon वर 1599 रुपयांना विकले जात आहे

 

 बोल्ट ड्रिफ्ट (boult drift)

 या स्मार्टवॉचमध्ये 240x280 पिक्सेल रिझोल्यूशन 1.69-इंचाचा TFT डिस्प्ले आहे. 500nits पीक ब्राइटनेस मिळेल.
60 प्रीसेट स्पोर्ट्स मोड बोल्ट ड्रिफ्टमध्ये हार्ट रेट मॉनिटर, स्लीप ट्रॅकर आणि 24/7 हार्ट रेट मॉनिटरिंग देखील आहे, Boult Drift भारतात 1499 रुपयांना मिळू शकतो.