रेडमी ६ स्मार्टफोनच्या खरेदीवर आकर्षक सूट !

भारतीय बाजारात शाओमी कंपनीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.

Updated: Jan 11, 2019, 06:21 PM IST
रेडमी ६ स्मार्टफोनच्या खरेदीवर आकर्षक सूट ! title=

 

मुंबई - नव्या वर्षाच्या निमित्ताने चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने रेडमी ६ च्या खरेदीवर आकर्षक ऑफर दिली आहे. ही शाओमी कंपनीची या श्रृंखलातील शेवटीची ऑफर असणार आहे. भारतीय बाजारात शाओमी कंपनीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने शाओमी कंपनीने २०१९ मध्ये ग्राहकांसाठी ५ आकर्षक ऑफर देणार असल्याचे आश्वासन दिले होते. शाओमी कंपनीचा रेडमी ६ स्मार्टफोन खरेदीवर ग्राहकांना १५०० रुपयांची सूट मिळणार आहे. 

 

रेडमी ६ची किंमत

कंपनीने रेडमी ६च्या किंमतीत १ हजार ५०० रुपयांची घट करण्यात आली आहे. रेडमी ६ (३जीबी रॅम/ ३२ जीबी स्टोअरेज) स्मार्टफोनला ७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करु शकतात. तसेच रेडमी ६ (३जीबी रॅम/ ६४ जीबी स्टोरेज) स्मार्टफोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये असणार आहे. शाओमी इंडियाचे एमडी मनुकुमार जैन यांनी ट्विटरच्या माध्यमातून या स्मार्टफोनच्या किंमतीत घट केल्याची माहिती दिली. 

 

रेडमी ६चे वैशिष्ट्ये

रेडमी ६ स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंच डिस्प्ले असणार आहे. या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा १२ मेगापिक्सल तर सेकंडरी कॅमेरा ५ मेगापिक्सल आहे. फोनमधील स्टोअरेज ३२ जीबी आणि ६४ जीबी आहे. मायक्रोएसडी  कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येणार आहे.