रिलायन्स जिओच्या ग्राहकांना झटका, जिओने कमी केला इंटरनेट स्पीड

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक आणि चिंताजनक बातमी आहे

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 20, 2017, 04:26 PM IST
रिलायन्स जिओच्या ग्राहकांना झटका, जिओने कमी केला इंटरनेट स्पीड title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक आणि चिंताजनक बातमी आहे. रिलायन्स जिओने आपले काही प्लॅन्स बंद केल्यानंतर आता इंटरनेटसंदर्भात आणखीन एक मोठा बदल केला आहे.

या नव्या बदलामुळे रिलायन्स जिओने प्रतिदिनचं लिमिट संपल्यानंतर वापरण्यात येणाऱ्या इंटरनेट स्पीडमध्ये घट करण्यात आली आहे. यामुळे इंटरनेटचा स्पीड अर्ध्याने कमी होणार आहे.

प्रतिदिनाचं इंटरनेट लिमिट संपल्यानंतर वापरण्यात येणाऱ्या इंटरनेटचा स्पीड पूर्वी १२८kbps होता. आता हा स्पीड घटवून ६४kbps करण्यात आला आहे. एक नजर टाकूयात कशा प्रकारे इंटरनेट स्पीड कमी झाला आहे.

समजा तुम्ही ३९९ रुपयांचा प्लॅन वापरता. त्यामध्ये तुम्हाला दररोड हायस्पीडमध्ये १जीबी इंटरनेट डेटा मिळतो. हा डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट अनलिमिटेड सुरु राहतं. पण, जिओने १जीबी इंटरनेट डेटा संपल्यानंतर सुरु राहणाऱ्या इंटरनेटचा स्पीड अर्ध्याने कमी केला आहे.

रिलायन्स जिओने आपला ३९९ रुपयांचा प्लॅनचा दर वाढवला आहे. आता जिओचा ३९९ रुपयांचा रिचार्ज तुम्हाला ४५९ रुपयांत मिळणार आहे. या रिचार्जमध्ये युजर्सला अनलिमिटेड इंटरनेट, कॉलिंग आणि मेसेजची सुविधा मिळणार आहे.

४५९ रुपयांच्या या प्लॅनची वैधता ८४ दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये ८४ दिवसांसाठी दररोज हायस्पीड १जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. दररोजचा इंटरनेट डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ६४kbps होणार आहे. तर, इंटरनेट अनलिमिटेड चालणार आहे.