मुंबई : सॅमसंग (Samsung) अनेक नाविन्यपूर्ण स्मार्टफोनसाठी ओळखला जातो. कंपनीने गॅलेक्सी एस 9 आणि गॅलेक्सी एस 9+ हे व्हेरिएबल अपर्चर कॅमेरा असलेले पहिले फोन होते. सॅमसंग 11 ऑगस्ट रोजी गॅलेक्सी झेड फोल्ड 3 आणि गॅलेक्सी झेड फ्लिप 3 लाँच करणार आहे. (Galaxy Z Fold 3 and Galaxy Z Flip 3 ) जे इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळे असणार आहेत. आता सॅमसंग काहीतरी नवीन करणार आहे. कंपनीने नवीन पेटंट दाखल केले आहे. ज्यात नमूद केले आहे की, आगामी काळात सॅमसंगच्या फोनमध्ये फिरता कॅमेरा असणार असेल. जाणून घेऊया त्याबद्दल ...
सॅमसंग (Samsung) कंपनीने आपल्या नवा स्मार्टफोन खास असणार आहे. कारण यात फिरता कॅमेरा असणार आहे. आपली वेगळी ओळख अबाधित राहण्यासाठी हा फोन लॉन्च होण्याआधीच कंपनीने पेटंट दाखल केले आहे. लेट्सगोडिजिटलच्या अहवालानुसार, सॅमसंग इलेक्ट्रो-मेकॅनिक्सने ऑक्टोबर २०२० मध्ये युनायटेड स्टेट्स पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिस (यूएसपीटीओ) आणि वर्ल्ड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (डब्ल्यूआयपीओ) यांच्याकडे 'कॅमेरा मॉड्यूल आणि पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह' नावाचे युटिलिटी पेटंट दाखल केले.
Samsungने आपल्या नव्या मोबाईलमध्ये फिरणारा कॅमेरा (movable camera) असणार आहे. याचे पेटंट आधीच घेण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे. त्यामुळे Samsungचे दायित्व कोणीही घेऊ शकणार नाही. या कॅमेरा फोटोसाठी एकदम जबरदस्त असणार आहे. सर्वोत्तम छायाचित्र घेता येणार आहे, हे या नव्या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आहे. हा movable camera असल्याने दृश्य चांगली घेता येणार आहे. तसेच व्हेरिएबल अपर्चर साध्य करण्यास मदत करणार आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पेटंट स्केच आणि प्रतिमा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा उपयोग करता येतो. ज्यात वाइड-एंगल स्नॅपर, अल्ट्रा-वाइड युनिट आणि टेलिफोटो शूटर असतात. वापरकर्ते टच इनपुटद्वारे हे कॅमेरे हलवू शकतात.
उदाहरणार्थ, जेव्हा मध्यभागी असलेला वाइड-अँगल कॅमेरा खाली सरकतो, तेव्हा डावी आणि उजवीकडील अल्ट्रा-वाइड आणि टेलिफोटो कॅमेरे अनुक्रमे आत सरकतात आणि त्रिकोण तयार करतात. आम्हाला असे वाटत नाही की सॅमसंग कधीही या तंत्रज्ञानासह मुख्य प्रवाहातील स्मार्टफोन रिलीज करेल. परंतु भविष्यात फ्लोटिंग कॅमेऱ्यांसह एक विशिष्ट गॅलेक्सी स्मार्टफोन असू शकतो, जसे की 2019 पासून गॅलेक्सी A80.