VIDEO: तिने फक्त ५ सेकंदात त्याला वाचवलं

ही घटना दक्षिण इंग्लंडमधील एका रेल्वे स्थानकावरील असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 19, 2018, 11:06 PM IST
VIDEO: तिने फक्त ५ सेकंदात त्याला वाचवलं title=

लंडन : एका धाडसी महिलेने प्रसंगावधान राखत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत,  ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.

हा व्हिडीओ मात्र फक्त पाच सेकंदाचा आहे, ही घटना दक्षिण इंग्लंडमधील एका रेल्वे स्थानकावरील असल्याचं सांगण्यात येत आहे. 

या व्हिडिओमध्ये प्लॅटफॉर्मवर बसलेली व्यक्ती ट्रेन येताना पाहून अचानक उठतो आणि रुळांवर उडी मारण्यासाठी जाताना दिसतो. तितक्यात त्या व्यक्तीच्या बाजूला असणारी ही महिला त्याला खेचून प्लॅटफॉर्मच्या दिशेने ढकलते, आणि त्याचा प्राण वाचतो.