१२ हजार रुपयांचा HD LED TV केवळ ५९९९ रुपयांत

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स सादर करत आहेत. या ऑफर्समध्ये घरोपयोगी वस्तू स्वस्त दरात मिळत आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 30, 2017, 08:30 AM IST
१२ हजार रुपयांचा HD LED TV केवळ ५९९९ रुपयांत title=

नवी दिल्ली : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स सादर करत आहेत. या ऑफर्समध्ये घरोपयोगी वस्तू स्वस्त दरात मिळत आहेत.

तुम्हाला घरोपयोगी वस्तू खरेदी करायच्या असतील तर ही एक चांगली संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुम्हीही या ऑफर्सला फायदा घेत खरेदी करु शकता.

मंथ एंड सेल

शॉपक्लूज (shopclues.com)वर सध्या मंथ एंड सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर बंपर ऑफर्स सुरु आहेत. मात्र, सर्वाधिक फायदा LED टीव्ही खरेदीवर मिळत आहे. जर तुम्हीही LED टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग, ही ऑफर तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. 

HD LED TV अवघ्या ५९९९ रुपयांत

शॉपक्लूज (shopclues.com)वर सुरु असलेल्या ऑफरनुसार Polaroid चा HD LED TV केवळ ५९९९ रुपयांत तुम्ही खरेदी करु शकता. या टीव्हीची किंमत ११,९९९ रुपये आहे. मात्र, शॉपक्लूजच्या सेलमध्ये तुम्हाहा या टीव्हीवर ५० टक्के सूट मिळत आहे. 

६००० रुपयांची बचत

म्हणजेच हा टीव्ही खरेदी केल्यास तुम्हाला ६००० रुपयांचा फायदा होणार आहे. हा टीव्ही खरेदी करताना तुम्हाला कॅश ऑन डीलिव्हरी (COD) चा पर्यायही उपलब्ध आहे.

हे आहेत फिचर्स

Polaroid च्या या एलईडी टीव्हीमध्ये १९.५ इंचाची LED स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये एलईडी रिझॉल्युशन १३६६X७६८ आहे. यासोबतच टीव्हीत HDMI, USB, PC Audio, RF Connectivity Input पोर्ट चा समावेश आहे. या टीव्हीला USB कनेक्ट करुन तुम्ही थेट सिनेमाही प्ले करु शकता. या टीव्हीला १० वॉल्टचे स्पीकर्सही देण्यात आले आहेत.

shopclues, polaroid hd led tv, offer on shopclues, hd led tv, hd led tv in 5999

आकर्षक ऑफर

शॉपक्लूजच्या सेलमध्ये युजर्स हा टीव्ही ईएमआयवर खरेदी करु शकतात. हा एलईडी टीव्ही ५३६ रुपयांच्या मासिक हफ्त्यांवर (EMI)खरेदी करु शकता. Mobikwik वॉलेटवरुन पेमेंट केल्यास १० टक्के एक्स्ट्रा सुपरकॅश देण्यात येणार आहे. तर, वोडाफोनच्या m-pesa वरुन अधिकाधिक १५० रुपयांचं कॅशबॅक मिळू शकतं. वेबसाईटकडून टीव्ही शिपिंगसाठी २४९ रुपयांचा चार्ज वेगळा घेण्यात येणार आहे.