Android Malware Alert in Marathi : आज जगात घराघरामध्ये मोबाईल फोन आहेत. स्मार्टफोन जग आहे. मोबाईल हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकांना मोबाईल शिवाय जगणे देखील कठीण वाटते. सकाळी उठल्याबरोबर आधी फोन शोधत असता. म्हणजेच मोबाईलशिवाय कोणतेही काम शक्य नाही, असे झाले आहे. याच मोबाईल वापकरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येते. जर तुम्ही स्मार्टफोन वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
गुगलने आपल्या प्ले स्टोरअरमधून मोबाईलसाठी धोकादायक ठरु शकणारे मोबाईल अॅप हटविले आहेत. असे एक 14 मोबाईल अॅप हटविण्यात आले आहेत ज्यात मालवेअर किंवा व्हायरस असण्याचा धोका आहे. या अॅप्सना एकूण 2.5 दशलक्ष वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. या अॅप्सवर गुगल प्ले डेव्हलपर पॉलिसीचा उल्लंघण केल्याचा देखील आरोप केला आहे. हे अॅप मोबाईलचा डेटा खात होते. स्क्रीन बंद असल्याने ते कार्यरत रहात होते.
सायबर क्राईमचं दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे. (Xamalicious Malware) सिक्युरिटी रिसर्चर्स रोज नवनव्या गोष्टींवर आणि मालवेअर्सवर काम करत असतात. त्यांचा शोध घेत असतात. मॅकेफी संशोधकांनी अॅंड्रॉइड युजर्ससाठी एक इशारा जारी केला आहे. ज्यात 'Xamalicious' नावाचा मालवेअर सापडला आहे, ज्याचा 3 लाखांहून अधिक परिणाम झाला आहे. गुगल प्लेस्टोअर (Google Playstore) 14 अॅप्समध्ये हा धोकादायक ब्लॉक मालवेअर सापडला आहे, जो लोकांच्या फोनमध्ये अॅक्सेस मिळवून डेटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
1 लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले
14 अॅप्सपैकी 3 अॅप्स असे आहेत की 1 लाखाहून अधिक लोकांनी ते डाऊनलोड केले आहेत. या मालवेअरमुळे अनेकांचा डेटा लीक झाला आहे. आणि अनेकांची प्रायव्हेट माहिती देखील लीक झाली आहे. मात्र यातच गुगल या अप्सवर कारवाई केली आहे. त्यांनी प्ले स्टोअर्सवरुन या सर्व अॅप्स हटवल्या आहेत.
-या व्यतिरिक्त 12 अॅप्स आहेत. ज्यावर 'Xamalicious' या मालवेअरने अटॅक केला आहे. APK फॉर्ममध्ये येणाऱ्या अॅप्सला या मालवेअरचा जास्त प्रमाणात धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे.