Tech Layoffs: कसली पगारवाढ अन् कसलं काय! आणखी एक IT Company 11000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ

Tech Layoffs: आयटी क्षेत्राला (IT Jobs) गेल्या काही वर्षांपासून ग्रहणच लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कोरोना (Coronavirus) काळापासूनच बघायचं झाल्यास या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनीच त्यांच्या नोकऱ्या गमावल्या. आता त्यात आणखी एक भर 

Updated: Jan 18, 2023, 12:40 PM IST
Tech Layoffs: कसली पगारवाढ अन् कसलं काय! आणखी एक IT Company 11000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ  title=
Tech Layoffs microsoft to remove 11000 employees post google amazon massive cost cutting latest Marathi news

Tech Layoffs: नव्या वर्षाची सुरुवात झाल्या क्षणापासून हे वर्ष आपल्यासाठी चांगलं असावं, आपली प्रगती व्हावी अशीच इच्छा अनेकांनी व्यक्त केली. पण, काहींच्या बाबतीत तसं होताना दिसत नाहीये. कारण, सध्याच्या घडीला आयटी (IT) क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या प्रगतीपथात अडथळे येत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. 2022 च्या अखेरीस बऱ्याच मोठ्या आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला. अगदी गुगल (Google) आणि अॅमेझॉनचाही (Amazon) यात समावेश होता. 2023 मध्ये ही परिस्थिती काही अंशी सुधारेल अशीच अनेकांना अपेक्षा होती पण तसं काहीच होताना दिसत नाहीये. 

मायक्रोसॉफ्टमध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ 

नव्या वर्षाचा पहिला महिना संपतही नाही, तोच जगातील एक मोठी आणि तितकीच नावाजलेली आयटी कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे. मायक्रोसॉफ्टसाठी एचआर आणि इंजिनिअरिंग विभाता काम करणाऱ्यांच्या नोकरीवर इथं गदा येऊ शकते. सध्याच्या घडीला या कंपनीतून एचआर डिपार्टमेंटमधील 5 टक्के कर्मचारी काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे. कंपनीतील एकूण कर्मचारी कपातीचा आकडा साधारण 11 हजारांच्या घरात असू शकतो. पण, अद्यापही या संस्थेकडून मात्र सदरीलम माहितीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. (Tech Layoffs microsoft to remove 11000 employees post google amazon massive cost cutting latest Marathi news )

हेसुद्धा वाचा : Tech Layoffs: वर्षाच्या पहिल्या 15 दिवसांत 24 हजार जणांनी नोकऱ्या गमावल्या; IT क्षेत्र आघाडीवर

प्राथमिक आकडेवारीनुसार मायक्रोसॉफ्टमध्ये परिस्थिती सुधारण्याचं नाव घेत नाहीये. यंदा मागील वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक कर्मचारी कपात केली जाणार आगे. जून 2022 ची आकडेवारी पाहिली असता या कंपनीसाठी साधारण  2,21,000 कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये 1,22,000 कर्मचारी अमेरिका तर, इतर 99000 कर्मचारी विविध देशांत काम करत होते. 

इतक्या प्रचंड प्रमाणात कर्मचारी कपात करण्यामागे कारण काय?

मागील त्रैमासिक काळातील अहवाल आणि एकूण आकडेवारी पाहता यादरम्यान Personal Computers च्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ज्यामुळं कंपनीच्या Windows आणि इतर डिवाईसच्या विक्रीवर थेट परिणाम झाले आहेत. याच कारणामुळं गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्येसुद्धा या कंपनीतून अनेकांना नोकरी गमवावी लागली होती. 2023 च्या सुरुवातीपासूनच साधारण 91 टेक कंपन्यांनी तब्बल 24 हजार 151 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ही आकडेवारी पाहता हे वर्ष या क्षेत्रासाठी प्रचंड कठीण असणार आहे हेच स्पष्ट होत आहे.