Auto: अप्सरा आली! 'या' लटेस्ट इलेक्ट्रिक स्कूटी पाहून असेच म्हणाल; समोर भारी भारी टू व्हिलर फिक्या पडतील

Auto News: हल्ली बाजारात नानाप्रकारच्या स्कुटी, गाड्या, कार्स उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये (Auto Market) भरपूर ऑप्शन्स मिळू लागले आहेत. आता सगळीकडे इलेक्ट्रिक कारची क्रेझ सुरू झाली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांकडेच स्वस्त आणि मस्त स्कूटर्सही उपलब्ध झाल्या आहेत. 

Updated: Dec 26, 2022, 12:12 PM IST
Auto: अप्सरा आली! 'या' लटेस्ट इलेक्ट्रिक स्कूटी पाहून असेच म्हणाल; समोर भारी भारी टू व्हिलर फिक्या पडतील title=
scooter

Auto News: हल्ली बाजारात नानाप्रकारच्या स्कुटी, गाड्या, कार्स उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये (Auto Market) भरपूर ऑप्शन्स मिळू लागले आहेत. आता सगळीकडे इलेक्ट्रिक कारची क्रेझ सुरू झाली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांकडेच स्वस्त आणि मस्त स्कूटर्सही उपलब्ध झाल्या आहेत. सध्या अशाच एका इलेक्ट्रिक कारची सगळीकडेच चर्चा आहे. ही स्कूटर तुम्हाला फक्त 45, 000 मध्ये मिळू शकते. सध्या या स्कुटीची सर्वत्र चर्चा आहे. चला पाहूया या स्कुटरच फिचर्स (Scooter Features) नक्की कसे आहेत. यंदा इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ देशात हळूहळू वाढू लागली आहे. त्याचसोबत आता पर्यावरणपुरक अशा परिस्थितीत लोकं सायकलही विकत घेत असताना आता लोकं अधिक पर्यावरणपुरक स्कुटर्सकडेही वळत आहेत. आता बाजारातही नव्या इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत आणि लोकंही त्या विकत घेत आहेत. काही इलेक्ट्रिक वाहनं महागही आहेत पण त्याच बरोबर काही वाहनं ही स्वस्त देखील आहेत. विशेषत: इलेक्ट्रिक स्कूटरचा विचार केला तर बाजारात अनेक स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. (tech news this electric scooter is most affortable than other with good features speed battery)

काय आहेत या इलेक्ट्रिक कार

1. एव्हॉन ई स्कूटची (Avon E-Scooter) किंमत 45,000 रुपये इतकी आहे. या स्कूटीची रेंज ही 65 किलोमीटर असून स्कूटरचा टॉप स्पीड 24KMPH आहे. स्कूटरची 215W BLDC इतकी मोटर आहे आणि ती 48V/20AH बॅटरीसह तूम्हाला मिळेल. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तास लागतात. तुम्हाला एवढ्या कमी किमतीत इतके चांगले फिचर्स या स्कूटीतून मिळतील. 

2. बाऊंस अनंत E1 (Bounce Anant B1) ची किंमत 45,099 रुपयांपासून सुरू होते. तुम्हाला या स्कूटीतूनही स्वस्तात चांगले फिचर्स मिळतील. याची बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत 68,999 रुपये आहे जी 2kWh/48V बॅटरीसह येते. एव्हॉनप्रमाणे या स्कूटरचा टॉप स्पीड 65kmph आहे आणि रेंज 85 किलोमीटर एवढी आहे. 

3. हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्सची (Hero Electric CX) किंमत 62,190 रुपये आहे. वरच्या दोन स्कूटीप्रमाणे या स्कूटरचा टॉप स्पीड 45 KM/H आहे आणि रेंज 82 किलोमीटर आहे. यात तीन रंगांचे पर्याय तूम्हाला हमखास मिळून शकतात. ही स्कूटी 51.2V/30Ah बॅटरीसह येते जी 4 ते 5 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते‌. त्यामुळे ही स्कूटी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. ऑफिस किंवा थोडीशी लॉन्ग ड्राईव्हला जातानाही तुम्ही ही स्कूटी विकत घेऊ शकता. 

4. पुढची स्कुटी आहे‌ बिग EX (Big X) यात एलसीडी स्क्रीन, इंटिग्रेटेड यूएसबी पोर्ट, कीलेस एंट्री आणि अँटी थेफ्ट अलार्म मिळतो. ही 1.2 kW मोटरसोबत येते. या स्कूटीचा टॉप स्पीड 55 किमी/तास आहे. यात 60V, 30Ah बॅटरी आहे जी 121 किमीची रेंज देते. वरील स्कूटीपेक्षा ही स्कूटी जरा महाग आहे. या स्कूटीची किंमत 73,999 रुपये आहे.