इंटरनेट कॉलिंग आणि मॅसेजिंगलाही आता पैसे मोजावे लागणार? टेलिकॉम विभागाचे महत्वाचे आदेश... वाचा

Social media internet calling messaging service : स्काईप, व्हॉट्सअ‍ॅप, सिग्नल गुगल मीट, फेसबुक मेसेंजर, टेलिग्राम यांसारख्या अनेक मोबाइल अ‍ॅप्सच्या इंटरनेट कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी पैसे मोजावे लागू शकतात.

Updated: Sep 1, 2022, 05:58 PM IST
इंटरनेट कॉलिंग आणि मॅसेजिंगलाही आता पैसे मोजावे लागणार? टेलिकॉम विभागाचे महत्वाचे आदेश... वाचा title=

Social media internet calling messaging service : देशभरात इंटरनेट कॉलिंगचा वापर अतिशय वेगाने होत असतानाच अनेकांनी नॉर्मल कॉल करणं बऱ्याच प्रमाणात बंद केलं आहे. कारण, इंटरनेट कॉलिंग त्यांना सामान्य कॉलिंगपेक्षा अधिकच आहे. पण आता बातमी समोर आली आहे की स्काईप, व्हॉट्सअ‍ॅप, सिग्नल गुगल मीट, फेसबुक मेसेंजर, टेलिग्राम यांसारख्या अनेक मोबाईल अ‍ॅप्सचे इंटरनेट कॉलिंग आणि मेसेजिंग चार्ज होऊ शकते. या संदर्भात DoT ने TRAI ला मोबाईल अ‍ॅप्स आणि त्यांच्या इंटरनेट कॉलिंग/मेसेजिंग वैशिष्ट्यांचे पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे.

टेलिकॉम कंपन्यांची सरकारकडे मागणी...

'समान सुविधांसाठी समान नियम' निश्चित करावेत, अशी मागणी टेलिकॉम कंपन्यांनी सरकारकडे केली आहे. याचाच अर्थ की, इंटरनेटवर आधारित कॉल्स आणि मेसेजही या कक्षेत आले पाहिजेत. त्यांच्याकडून टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे परवाना शुल्क आकारण्यात यावे. त्यासोबतच, कायदेशीर अडथळे, सेवा सुधारणे या नियमांचं पालन करण्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. टेलिकॉम कंपन्यांनी 'वन सर्व्हिस, वन चार्ज' अंतर्गत म्हटलं आहे की, 'हे अ‍ॅप्स टेलिकॉम कंपन्या आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला (ISP) सारखचं पहायला पाहिजे.'

टेलिकॉम विभाग ट्रायकडून सूचना...

या सर्व मागण्या लक्षात घेऊन टेलिकॉम विभागाने ट्रायकडून सूचना मागवल्या आहेत. DoT ने असं सांगितलंय की, TRAI कडून सूचना मागवताना, या अ‍ॅप्सवरून इंटरनेट कॉलिंग आणि मेसेजिंग कायदेशीर चौकटीत आणलं जाऊ शकते का? या संदर्भात टेलिकॉम विभागाने Internet Based Telephony वरील 2008 च्या शिफारसींचे पुनरावलोकन करण्यास सांगितलं आहे.