मस्त प्लॅन है| Jio च्या या Plan पेक्षा आणखी चांगलं काहीच नाही, 3GB डेटा आणि Benefits

Reliance Jio Cheapest Plan : रिलायन्स जियोच्या (Reliance Jio) या प्लॅनची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे.  

Updated: Sep 21, 2022, 11:05 PM IST
मस्त प्लॅन है| Jio च्या या Plan पेक्षा आणखी चांगलं काहीच नाही, 3GB डेटा आणि Benefits

Reliance Jio Cheapest Plan : रिलायन्स जिओने (Reliance Jio) टेलिकॉम सेक्टरमध्ये (Telecom Sector) क्रांती घडवली. जिओ आपल्या युझर्ससाठी नवनवीन प्लॅन आणत असते. असाच एक अफलातून प्लॅन जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे. हा प्लॅन अगदी परवडणाऱ्या दरात आहे. तसेच या प्लॅनमध्ये 3 Gb इंटरनेट आणि ओटीटी मेंबरशिपसारख्या इतर सोयी आहेत. या प्लॅनची किंमत फक्त 100 रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लॅनबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. (telecom sector jio cheap plan only 91 ruppes 3 gb date sms only for jiophone users know all details)

100 रुपयांपेक्षा स्वस्त Jio चा Plan

रिलायन्स जियोच्या (Reliance Jio) या प्लॅनची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे. यूझर्सना या प्लॅनसाठी फक्त 91 रुपये मोजायचे आहेत. या प्लॅनची वेलेडिटी ही 28 दिवसांची असणार आहे. 

Jio च्या Planचे बेनिफिट्स

91 रुपयांच्या या प्लॅनमध्ये जिओ युजर्सना कोणते फायदे मिळणार आहेत, हे जाणून घेऊयात.  Jio चा हा प्लान ग्राहकांना 3GB हाय स्पीड इंटरनेट देतो. यासोबत तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 50 SMS सुविधा देखील मिळतात. इतकंच नाही तर Jio चा 91 रुपयांचा प्लॅन (Jio Cinema), (Jio TV) आणि (Jio Cloud सारख्या सर्व Jio अॅप्सच्या सबस्क्रिप्शनसह येतं.

शेवटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्लॅन सर्व जिओ यूझर्स वापरु शकत नाहीत. या प्लॅनचा लाभ फक्त JioPhone ज्यांच्याकडे आहे, तेच घेऊ शकतात. कारण ही परवडणारी योजना खास JioPhone वापरकर्त्यांसाठी आहे.