मुंबई : सध्याचा जमाना डिजीटल आहे. बहुतांश कामं ही ऑनलाईनच होतात. अनेक व्यवसायिकांनी डिजीटल पद्धतीने गेल्या काही वर्षांपासून आपल्या व्यवसायाची जाहिरात केली आहे. Google My Business च्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहचवू शकता. गूगल (Google) सर्च किंवा मॅपमध्ये माहिती अपडेट करणं ही सर्वसामान्य बाब झाली आहे. पण गूगलकडे बिजनेससाठी गूगल सर्च तसेच मॅपमध्ये कोणतेही बदल न करता त्यात दुरुस्त करण्याचे अनेक पर्याय आहेत. याद्वारे तुम्ही तुमच्या व्यवसायात वाढ करु शकता. (These special tricks of Google will catch your business know how to edit business profile)
व्यवसायिक बिजनेस कॉन्टॅक्ट डिटेल आणि ओपनिगं टाईम (कार्यालय किंवा दुकान सुरु होण्याची वेळ) यासारखी अधिक माहिती जोडू शकता. त्यासाठी तुम्ही पोस्टही तयार करु शकता.
व्यवसायासाठी गूगल पोस्ट तयार करुन ती पब्लिश करणं आव्हानात्मक राहिलं आहे. पण आता SERPs च्या मदतीने केलं जाऊ शकतं. Google My Business मध्ये पोस्ट केल्याने सर्च करणाऱ्यांना स्पेशल ऑफर किंवा नवीन उत्पादनाची माहिती देणं सहज सोपं होतं. पुढील आठवड्यापासून व्यवसायासंबंधित कार्यक्रमाबाबतची सविस्तर माहिती पोस्टद्वारे देता येणार आहे.
ऑटो रिपेयरिंग, केशकर्तनालय यासारख्या सेवा देणारे सर्चमध्ये ‘Edit Profile' या पर्यायावर जाऊन त्यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांबाबत सविस्तर माहिती जोडू शकतात.
Google हॉटेल व्यावसायिकांना Google सर्च आणि मॅपच्या मदतीने थेट बिजनेस प्रोफाईलच्या माध्यमातून टेकआउट आणि डिलीव्हरी ऑर्डर स्वीकारण्याची परवानगी देते. येत्या आठवड्यापासून व्यावसायिक थेट Google सर्चच्या माध्यामातून ऑर्डर करण्याचा पर्याय जोडून ते गरजेनुसार अपडेट करु शकतात.
तसेच व्यावसायिक त्यांच्याकडे उपलब्ध असलेले उत्पादन स्कॅन करुन ते थेट Google My Business सोबत जोडू शकतात. जेणेकरुन ग्राहकांना दुकानदाराकडे कोणत्या वस्तू साठ्यात आहे, याची माहिती मिळते. हे सर्व Pointy च्या माध्मातून करता येतं. Pointy च्या मदतीने तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत विनामूल्य साईन अप करु शकता.
बिजनेस प्रोफाईलमध्ये ही सर्व माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला गूगल लॉगीन करावे लागेल. यानंतर गुगल सर्चमध्ये My Business’ म्हणजेच तुमच्या सेवा देणाऱ्या दुकानाचं नाव टाईप करु शकता. शिवाय गूगल मॅपमध्ये प्रोफाईल फोटोनंतर ‘Your Business Profile’ वर टॅप करु शकता.
संबंधित बातम्या :
Vi चा 'हा' प्लान Jio ला देतोय टक्कर, रोज 4GB डेटा सोबत फ्री कॉलिंग
Hyundai ची सर्वात मोठी SUV Alcazar आज होणार लाँच; जाणून घ्या फिचर्स