Xiaomi चा आजपासून बंपर सेल...

स्मार्टफोन ते टीव्हीवर भरपूर सूट 

Xiaomi चा आजपासून बंपर सेल...

मुंबई : देशातील नंबर वन स्मार्टफोन कंपनी शाओमी ख्रिसमसच्या अगोदर बंपर सेल घेऊन येत आहे. हा सेल 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर असणार आहे. यामध्ये तुम्ही स्मार्टफोन्स, टीव्ही आणि एक्सेसरीज खरेदी करू शकता. यामध्ये खरेदी केल्यास भरपूर डिस्काऊंट ऑफर मिळणार आहे. 

या बंपर सेलकरता कंपनीने गुगल, मोबिक्विक आणि पेटीएमसोबत भागिदारी केली आहे. या सेलमध्ये तुम्हाला सर्वाधिक जास्त बजेट स्मार्टफोन मिळणार आहेत. 

जर तुम्ही 10 ते 15 हजारांपर्यंत फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये खूप चांगली संधी आहे. 

या स्मार्टफोनवर मिळणार स्पेशल ऑफर 

नंबर 1 Mi फॅन्स सेल या नावाने सुरू होणाऱ्या या सेलमध्ये Redmi Y2 9,999 रुपयांऐवजी 8,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. तसेच पेटीएमद्वारे खरेदी केल्यास 300 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. 

Redmi Note 6 Pro तुम्हाला या सेलमध्ये 14 हजारात मिळणार आहे. त्यावर 300 रुपये कॅशबॅक दिला जाणार आहे. 

यासोबतच अनेक स्मार्टफोन आहेत ज्यावर जबरदस्त डील आणि उत्तम डिस्काऊंट देण्यात आला आहे. 

कॅशबॅक मिळणाऱ्या फोनमध्ये Redmi Y2, Redmi Note 6 Pro, Mi A2, Poco F1, Redmi 6, Redmi 6A, Redmi 6 Pro आणि Redmi Note 5 Pro यांचा समावेश आहे. 

TV खरेदीवर मिळणार सूट 

स्मार्टफोन्सप्रमाणेच शाओमीच्या Mi TV मॉडेल्सवर देखील मोठा सेल आणि डिस्काऊंट्स दिला जाणार आहे. Mi Tv 4A Pro 49 मॉडेल 30,999 रुपयांत मिळणार आहे. 

तर Mi Tv 4C Pro 32 हा टीव्ही 14,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. MI TV 4A 43 मॉडेल सेलच्या दरम्यान ग्राहकांना 21,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.