Tech news: मोबाईलवरून घरबसल्या कमवा पैसे! जाणून घ्या कसं

तुम्हाला माहिती आहे तुमचा हातातील हा मोबाईल तुम्हाला मालामाल करु शकतो. हो, बरोबर एक छोटासा मोबाईल तुम्हाला घरबसल्या पैसे कमावून देऊ शकतो. 

Updated: Aug 21, 2022, 05:07 PM IST
Tech news: मोबाईलवरून घरबसल्या कमवा पैसे! जाणून घ्या कसं  title=
trending news how to earn money online from mobile phone in marathi

Easy ways to make money - आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल सर्रास दिसून येतो. लोकांचा दिवसातील अनेक वेळ हा सोशल मीडियावर जात असतो. सोशल मीडियावर येणार व्हिडीओ असो किंवा रील पाहून आपली करमणूक करत असतात. महिला तर सतत मोबाईलमध्ये असतात अशी, अनेक पुरुषांची तक्रार असते. पण तुम्हाला माहिती आहे तुमचा हातातील हा मोबाईल तुम्हाला मालामाल करु शकतो. हो, बरोबर एक छोटासा मोबाईल तुम्हाला घरबसल्या पैसे कमावून देऊ शकतो. हे कसं शक्य आहे तर याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

तुम्ही सोशल मीडिया वापरता ना? म्हणजे Facebook आणि Instagram वगैरे वापरताना. मग  यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, कंटेंट रायटिंग आणि ब्लॉगिंगमधून तुम्ही पैसे कमवू शकता. (trending news how to earn money online from mobile phone in marathi)

YouTube

व्हिडीओ क्षेत्रात YouTubeने मोठी क्रांती घडवली आहे. YouTubeवर तुम्हाला हवं ते पाहिला मिळतं. कुठलाही सिनेमा असो किंवा जुन्या टीव्ही मालिका असो वा गाणी असो यावर सहज पाहिला मिळतात. अगदी एखादी क्रिकेटची मॅच असो किंवा हॉकीची अगदी एखादा जुन्या बातमीचा व्हिडीओ असो तो तुम्हाला YouTubeवर पाहिला मिळतो. पण तुम्हाला माहिती आहे YouTubeवरुन तुम्ही पैसे कमावू शकता ते. YouTube वर तुम्ही तुम्ही एक चॅनेल तयार करा आणि त्यात व्हिडीओ अपलोड करा. तुमच्या चॅनेलचे सदस्य 1000 आणि तास 4000 पूर्ण झाले तर तुम्हाला व्ह्यूजनुसार पैसे मिळतात. 

Facebook

सोशल मीडियावरील Facebook हे सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला माहिती आहे का पण Facebookवरुन तुम्ही पैसे कमावू शकता ते. यासाठी तुम्हाला एक पेज तयार करावे लागेल आणि त्यावर व्हिडीओ आणि फोटो अपलोड करावे लागतील. यासाठी तुम्हाला फेसबुक स्टुडिओ अॅपची मदत घ्यावी लागेल. यानंतर तुमच्या पेजला किमान 10 लाइक्स किंवा फॉलोअर्स मिळाले तर तुम्हाला जाहिरातीतून चांगले पैसे मिळू शकता. इथे तुम्ही प्रमोशनमधूनही पैसे कमावू शकता. 

Instagram

Facebook नंतर Instagram हे सगळ्यात लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. Instagram हे गावागावात पोहोचलं आहे. खेडगावातील लोकसुद्धा आता रील्सच्या जगात आले आहेत. तुम्ही Instagram वर रील्स बनवू पैसे कमावू शकता. त्यासाठी Instagram वर ऑप्टिमायझेशनसाठी 1000 किंवा त्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असायला हवे. 

ब्लॉगिंग

हा पण एक पैसे कमविण्याचा उत्तम मार्ग आहे. पण यासाठी तुम्हाला लिखाणाची आवड असायला हवी. सध्याच्या जगात ब्लॉगिंगची खूप चर्चा आहे. तुम्ही HindiYukti.com आणि Blogger.com वर मोफत ब्लॉग तयार करून लेखन सुरू करू शकता. पेजव्ह्यूजनुसार इथे पैसे येतच राहतील. तुम्ही Google Adsense वर तुमचं पेज शेअर करु शकता. 

ऑनलाइन गेम

लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना ऑनलाइन गेम खेळायला आवडतात. पण तुम्हाला माहिती आहे या ऑनलाइन गेममधून तुम्हाला पैसे मिळू शकतात ते. तुम्ही SkillClas, Winzo, Bigcash आणि Gamezy अॅप्सवर गेम खेळल्यास तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. क्रिकेट, कार रेसिंग, फ्रूट कट, बबल शूटर, लुडो असे खेळ आहेत. ज्यात तुम्ही जिंकले तर तुम्हाला पैसे मिळतात.