'या' सोप्या पद्धतीने ओळखा तुमचे जीमेल अकाऊंट हॅक झालेय!

जीमेल अगदी सर्वजण सर्रास वापरतात.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 2, 2017, 10:32 AM IST
'या' सोप्या पद्धतीने ओळखा तुमचे जीमेल अकाऊंट हॅक झालेय! title=

मुंबई : जीमेल अगदी सर्वजण सर्रास वापरतात. मात्र हल्ली  अकाऊंटस हॅक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांच्या डेटा पासून ते वैयक्तिक माहिती सहज चोरली जाते. हा धोका लक्षात घेऊन जीमेलने युजर्सना काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा वापर करून तुम्ही तुमचे जीमेल अकाऊंट हॅक झाले आहे का, हे तपासून पाहू शकता. ते कसे तपासावे यासाठी काही टिप्स. 

जीमेलमध्ये असलेल्या सेटिंगमुळे तुमचे अकाऊंट दुसरं कोणी वापरत आहे का किंवा कधी वापरले आहे का, हे समजू शकते. इतकंच नाही तर एखाद्याने आपले अकाऊंट किती वेळा वापरले आहे, हे देखील कळू शकते. 

हे तपासण्यासाठी जीमेल ओपन केल्यावर खाली उजव्या बाजूला डिटेल्स असे लिहिलेले आहे. त्यावर क्लिक केल्यास एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये कोणत्या सर्व्हरवरुन किती वेळासाठी तुमचा जीमेल वापरला गेला आहे, याची माहिती मिळेल. यामध्ये ठिकाण, वेळ अगदी आयपी अॅड्रेस सह संपूर्ण माहिती असेल. 

याच विंडोच्या वरच्या बाजूला ‘साईन आऊट फ्रॉम ऑल अदर सेशन्स’ असा पर्याय आहे. त्यावर क्लिक केल्यास तुम्ही इतर सगळ्या ठिकाणाहून लॉगऑऊट व्हाल. त्यानंतर तुम्ही पासवर्ड बदलून पुन्हा तुमचे जीमेल अकाऊंट वापरु शकता.