भारतात लवकरच लॉन्च होणार Street Triple 765 RS

ब्रिटिश मोटरसायकल निर्माता कंपनी ट्रायम्फ भारतीय बाजारपेठेत आपली नवी बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या बाईकचं नाव स्ट्रीट ट्रिपल 765 RS असं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 8, 2017, 09:14 PM IST
भारतात लवकरच लॉन्च होणार Street Triple 765 RS title=

नवी दिल्ली : ब्रिटिश मोटरसायकल निर्माता कंपनी ट्रायम्फ भारतीय बाजारपेठेत आपली नवी बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या बाईकचं नाव स्ट्रीट ट्रिपल 765 RS असं आहे.

ट्रायम्फ कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बाईकचे तीन वेरियंट यापूर्वीच लॉन्च केले आहेत. बेस मॉडलच्या तुलनेत Street Triple 765 RS चं इंजिन अधिक चांगलं असेल. बेस मॉडेलचं इंजिन ११३ हॉर्सपॉवर आणि ७३ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. या बाईकची किंमत १० ते ११ लाख रुपयांच्या आसपास असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

एक्स्ट्रा पॉवरसोबतच ब्रेम्बो एम 50 ब्रेक्स देण्यात आले आहेत. हे ब्रेक्स अमूमन टॉप अँड सुपरबाईक्समध्ये पाहण्यास मिळतात. ट्रायम्फ ही नवी बाईक भारतीय बाजारपेठेत पूर्ण तयारीने आणण्याच्या तयारीत आहे.

या बाईकमध्ये सुपर स्टिकी Pirelli Supercorsa टायर्स लावण्यात आले आहेत. अशा प्रकारचे टायर्स हाय परफॉर्मंस मोटरसायकल्समध्ये लावण्यात येतात. या बाईकचा लूक खूपच अॅक्टिव्ह असणार आहे. स्ट्रिट ट्रिपल 765RS या बाईकला मॅट कलर स्कीमने पेंट करण्यात आलं आहे. या गाडीत रायडिंग मोड्सचं ऑप्शनही देण्यात आलं आहे.

ट्रायम्फने स्ट्रिट ट्रिपल बाईकच्या तीन व्हेरियंट्स भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. मात्र, आता कंपनीने केवळ Street Triple 765 RS बाईक भारतात लॉन्च करण्याचं ठरवलं आहे. कंपनी भारतात मिड स्पेक्स असलेली स्ट्रिट ट्रिपल 765 R मॉडल लॉन्च करणार नाहीये.