Twitterने आणले आणखी एक जबरदस्त फीचर, मित्रांबरोबर चॅट करणे होणार मजेदार

Twitter news : ट्विटर (Twitter)इफेक्ट स्नॅपचॅट स्टोरीज सारख्या Fleets मध्ये आणखी एक फीचर जोडत आहे, जे Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. 

Updated: Apr 3, 2021, 08:24 AM IST
Twitterने आणले आणखी एक जबरदस्त फीचर, मित्रांबरोबर चॅट करणे होणार मजेदार  title=
Pic / Reuters

मुंबई : Twitter news : ट्विटर (Twitter)इफेक्ट स्नॅपचॅट स्टोरीज सारख्या Fleets मध्ये आणखी एक फीचर जोडत आहे, जे Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. वापरकर्ते स्क्रीनच्या तळाशी हसर्‍या चेहर्‍यावर टॅप करून स्टिकर जोडू शकतात. मायक्रो-ब्लॉगिंग साइटने त्याच्या प्लेटफॉर्मवर लिहिले, "आपल्या Fleetsमध्ये अपग्रेडशन झाले आहे." (Twitter adds another interesting feature to Fleets) 

कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, "आता आपण स्टिकर्सशी संभाषणात स्वत: ला व्यक्त करु शकता. Android आणि iOS वर आपण स्माइली चिन्हावर टॅप करुन जीआयएफ आणि ट्वेमोजिस एका Fleetsमध्ये जोडू शकता. "

द व्हर्जच्या मते ट्विटर (Twitter) स्वत: चे अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स आणि इमोजीजचे संग्रह जोडत आहे. ज्याला कंपनी  आधी ट्विमेजी म्हणत होती. तसेच आपण स्क्रीनच्या शीर्षस्थानी काहीतरी शोधत असाल तर, ट्विटर टेनर आणि फेसबुकच्या मालकीच्या जिफ्फीकडून जीआयएफ निवडेल. असेच वैशिष्ट्य स्नॅपचॅट किंवा इंस्टाग्राम सारख्या अन्य प्लॅटफॉर्मवर आधीपासून उपलब्ध आहे.

कंपनीने जगभरातील सर्व युजर्ससाठी नोव्हेंबर 2020 मध्ये या Fleetsचे अनावरण केले. ट्विटरने म्हटले आहे की, ब्राझिल, इटली, भारत आणि दक्षिण कोरियामधील Fleetsची चाचणी उत्साहजनक होती. ट्विटरने पाहिले की, लोक Fleets प्लॅटफॉर्मवर अधिक बोलत आहेत.

Twitter युजरपर्यंत अधिकाधिक चांगल्या प्रकारे पोहोचण्यासाठी नवीन फीचर्सही बाजारात आणत आहे. ब्राझिल आणि इटलीनंतर भारत जगातील तिसरा देश आहे जिथे कंपनीने आपले नवीन फीचर सादर करण्याचा विचार केला आहे. असे फीचर सध्या इंस्टाग्रामवर आहे.

Twitterच्या मते, या फीचरसह, युजर 24 तासांमध्ये स्वयंचलितपणे अदृश्य होणारी सामग्री सामायिक करण्यास सक्षम असतील. भारतात, हे Appleच्या आयओएस आणि गूगलच्या अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. हे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील 'स्टोरी' फीचरसारखेच असेल.