75 रुपयात इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि खूप काही, 'या' कंपनीचा स्वस्त प्लान

अशाच एका स्वस्त प्रीपेड प्लानबाबत (Jio Cheapest Prepaid Plan) सांगणार आहोत.  

Updated: Oct 31, 2022, 05:16 PM IST
75 रुपयात इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि खूप काही, 'या' कंपनीचा स्वस्त प्लान  title=

मुंबई : रिलायन्स जिओने (Reliance Jio) टेलिकॉम सेक्टरमध्ये (Telecom Sectro) नवी क्रांती घडवली. रिलायन्स जिओ देशातील सर्वोत्तम टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. जिओ नेहमीच आपल्या यूझर्सना परवडणाऱ्या दरात धमाकेदार प्लान्स देत असतं. आम्ही अशाच एका स्वस्त प्रीपेड प्लानबाबत (Jio Cheapest Prepaid Plan) सांगणार आहोत. जिओच्या 75 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि इतर फायदे आहेत. या प्लानबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात. (unlimited calling sms and internet data reliance jio chepest 75 ruppes plan know details)

जिओचा स्वस्त प्लान

जिओच्या सर्वात स्वस्त प्रीपेड प्लानची किंमत 75 रुपये इतकी आहे.  या प्लानची वेलिडिटी एकूण 23 दिवसांची आहे. या 75 रुपयांच्य प्लानमध्ये खूपसारे बेनिफिट्स देण्यात येत आहेत. 

अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि खूप काही

जिओच्या या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉईस कॉलिंग, दररोज 100 एमबी डेटा म्हणजेच महिन्याला 2.5  GB डेटा आणि 50 एसएमएसचा समावेश करण्यात आला आहे. डेली डेटा संपल्यानंतर 60 केबीपीएस इतकी इंटरनेट स्पीड असेल. तसंच या प्लानसोबत जिओ सिनेमा (Jio Cinema), जिओ सिक्योरिटी (Jio Security) आणि जिओ क्लाउड (Jio Cloud) या आणि यासारख्या जिओच्या सर्व Appsचं सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे.