Viral Video | स्वप्न नव्हे सत्य! दोन मिनिटांत विमानाचं रुप घेते ही Flying Car

चक्क हवेत उडणाऱ्या एका कारची  (Flying Car) यशस्वी चाचणी नुकतीच पार पडली आहे. 

Updated: Jun 30, 2021, 06:59 PM IST
Viral Video | स्वप्न नव्हे सत्य! दोन मिनिटांत विमानाचं रुप घेते ही Flying Car title=

नवी दिल्ली : 'मला पंख असते तर....', असा निबंध आपल्याला अनेकदा शाळेमध्ये लिहायला सांगण्यात आहे. कल्पनाशक्तीच्या बळावर अनेकांनीच आपल्या स्वप्नांना पंखही लावले. त्यानंतर 'द जेटसन्स' या कार्टूनमध्ये अनेकांनीच या हवेतील किंबहुना अंतराळातील विश्वाची सफर केली. कल्पना शक्तीच्या बळावर रेखाटलेलं एक असंच चित्र सध्या सत्यात उतरलं असून, त्याची झलक पाहून सारं जग थक्क झालं आहे. कारण चक्क हवेत उडणाऱ्या एका कारची यशस्वी चाचणी नुकतीच पार पडली आहे. (Viral Video flying car completes test flight between airports capable of running on land and air) 

जवळपास मागच्या 30 वर्षांपासून स्लोव्हाकियाच्या KleinVision नावाच्या कंपनीनं हा अफलातून शोध जगासमोर आणला आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार हल्लीच या उडत्या कारची अर्थात फ्लाईंग कारची चाचणी निर्धारित विमानतळांवर घेण्यात आली. जमीन आणि हवेत ही कार धावते आणि उडते. अवघ्या दोन मिनिटांत ही कार विमानात रुपांतरित होते. या फ्लाईंग कारमध्ये एअरक्राफ्ट, एअरकार, बीएमडब्ल्यू इंजिन देण्यात आलं आहे.

फ्लाईंग कारचे निर्माते स्टीफन क्लेन यांनी केलेल्या दाव्यानुसार ही कार जवळपास 1000 किमी (600 मैल) आणि 8200 फूट (2500 मीटर) उंचीवर उडते. कारपासून एअरक्राफ्टमध्ये रुपांतरीत होण्यासाठी जवळपास 2 मिनिटं 15 सेकंद इतका वेळ लागतो. क्लेन यांच्या माहितीनुसार कारमध्ये 2 व्यक्ती बसू शकतात.

अनेकांच्याच भुवया उंचावणाऱ्या या कारला हवेत झेपावण्यासाठी रनवेची आवश्कता आहे. या कारची वैशिष्ट्य, काळानुरुप यामध्ये असणारं तंत्रज्ञान पाहता हा शोध म्हणजे एक मैलाचा दगड आहे असंही म्हटलं जात आहे. दर दिवशी लागणाऱ्या नवनवीन शोधांमध्येच सर्वांसमक्ष आलेली ही कार येत्या काही वर्षांमध्ये रस्त्यावर धावताना आणि हवेत उडताना तुम्हाला कुठं दिसली तर यात आश्चर्य वाटायला नको.

संबंधित बातम्या : 

Ducati ची 12 किलो वजनी स्कूटर परवडणाऱ्या दरात; एका क्लिकवर जाणून घ्या किंमत

या 5 इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत मोठी घट, थेट 18,000 रुपयांची सूट

Hyundai ची सर्वात मोठी SUV Alcazar आज होणार लाँच; जाणून घ्या फिचर्स