स्मार्टफोन विकण्यापू्र्वी डेटा अशाप्रकारे करा डिलीट!

तुम्ही स्मार्टफोन विकण्याचा विचार करत आहात?

Updated: Mar 24, 2018, 12:41 PM IST
स्मार्टफोन विकण्यापू्र्वी डेटा अशाप्रकारे करा डिलीट! title=

मुंबई : तुम्ही स्मार्टफोन विकण्याचा विचार करत आहात? मग तो विकण्यापूर्वी चेक करणे गरजेचे आहे. का? तुम्हाला माहित आहे का, स्मार्टफोन विकण्यापूर्वी केलेली एक चूक तुम्हाला किती महागात पडू शकते? 

जर तुम्हाला तुमचे हे नुकसान टाळायचे असल्यास स्मार्टफोन विकण्यापूर्वी चेक करा. खरंतर असे अनेक सॉफ्टवेअर आहेत की ज्याच्या मदतीने तुम्ही फोनमधील डेटा रिकव्हर करु शकता. त्यामुळे फोनमधील डेटा नष्ट करणे गरजेचे आहे. तर जाणून घ्या डेटा कसा डिलीट कराल....

फोन Encrypt करा

गुगलने आपल्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक बदल केले आहेत. त्यामुळे आता अॅनरॉईड ६.० मार्शमेलो किंवा त्यावर वरील ओएसमध्ये फोन बाय डिफॉल्ट इनक्रिप्टेड होतात. जर तुमचा स्मार्टफोन अॅनरॉईड ५.१ लॉलीपॉप किंवा त्याच्या खालच्या ओएसवर काम कत असेल तर फोन अशाप्रकारे इनक्रिप्ट करा.

मोटरोला फोनसाठी...

Settings>Security>Encrypt phone

गुगल पिक्सल आणि नेक्सस स्मार्टफोन्ससाठी...

Settings > Security & Location

सॅमसंग स्मार्टफोन्ससाठी...

Settings > Lock screen and Security > Encrypt phone

फोन करा Factory Reset

आपल्या फोनवर फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अॅपवर जावून लॉग आऊट करा. त्यानंतर फोनची फॅक्ट्री रिसेट करा. फोन अशाप्रकारे रिसेट करा...
Settings>Backup & reset>Factory Data Reset>RESET PHONE