फेसबूक लाईट मेसेंजरची नवीन फिचर्स माहितीयेत का?

या नव्या फेसबूक लाईट मेसेंजर अॅपची साईझ ही केवळ १० एमबी इतकीच आहे. 

Updated: Dec 6, 2018, 08:02 PM IST
फेसबूक लाईट मेसेंजरची नवीन फिचर्स माहितीयेत का?

मुंबई | फेसबूक आपल्या युझर्सना काहीनकाही नवं देण्याच्या प्रयत्नात असतं. फेसबूक अॅपमध्ये नवनवीन अपडेट्स देत असतं. फेसबूकने आपल्या मेसेंजर लाईट अॅप अपडेट केला आहे. यात काही बदल केले आहेत. या फेसबूक लाईट मेसेंजरमध्ये नवीन फिचर्स जोडले आहेत. यात अॅनिमेटेड GIFs आणि कस्टमायजेशन फीचर्सचा समावेश आहे. आतापर्यंत हे सर्व फिचर्स जास्त साईजच्या मेसेंजर अॅपमध्येच होते. पण आता युजर्सची वाढती संख्या पाहता लाईट व्हर्जनमध्येही फेसबूकने हे फिचर्स अॅड केले आहेत.

यापूर्वी फेसबूकच्या लाईट मेसेंजर अॅपमध्ये ज्या GIF फाईल असायच्या, त्या अॅनिमेटेड नसायच्या. मात्र, आता अपडेटेड GIF फाईल्समुळे युजर्स आपल्या भावना सहजरित्या व्यक्त करु शकतील. GIF फाईल पाठवण्यासाठी गुगल किबोर्ड ओपन केल्यावर GIF फाईल सर्च केल्यावर युझर्सला मेसेज पाठवता येतील. 

युझर्सचे एकाच नावाचे अनेक मित्र असतात. त्यामुळे गोंधळ होतो. हो गोंधळ टाळण्यासाठी फेसबूकने फ्रेंड्स आणि ग्रुप सोबतच्या चॅटींगसाठी रंगाचा आणि इमोजीचा वापर करता येईलं. या नव्या फेसबूक लाईट मेसेंजर अॅपची साईझ ही केवळ १० एमबी इतकीच आहे. हा फेसबूक लाईट मेसेंजर अॅपचा वापर जवळपास १०० देशांमध्ये केला जातो. काही दिवसांपूर्वीच यामध्ये व्हिडीओचा कॉलिंगचा पर्याय जोडण्यात आला होता.