RBI Paytm Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएम (Paytm) पेमेंट बँक लिमिटेडविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएमवर कारवाई करत निर्बंध लावले आहेत. पेटीएममध्ये पैसे भरणे आणि काढणे यासह सर्व व्यवराहांवर बंदी घातली आहे. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्स चिंतेत आहेत. पेटीएमवर बंदी आणल्याने आता आपण नेमक्या कोणत्या सुविधा वापरु शकतो याची चिंता युजर्सना आहे.
आरबीआयने परिपत्रक काढत या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार, वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खासगी लेखापरीक्षणांच्या अहवालातून पेटीएम पेमेंट बॅंकेने आरबीआयने आखून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली केली असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने परिपत्रकात म्हटलं आहे.
केंद्रीय बँकेने मार्च 2022 मध्ये PPBL ला नवे ग्राहक जोडू नये असं सांगितलं होतं. पण तापासात पेटीएमने याचं पालन केलं नसल्याचं समोर आलं. यानंतर आरबीआयने PPBL वर निर्बंध लावले आहेत.
आरबीआयने PPBL च्या सर्व सेवांमध्ये नव्याने पैसे घेण्यावर आणि क्रेडिट व्यवहारावर बंदी घातली आहे. आरबीआयने प्रेस रिलीजमध्ये माहिती दिली आहे की, पैसे भरणे आणि काढणे दोन्हीवर बंदी घालण्यात आली आहे.
- आरबीआयच्या आदेशानंतर पेटीएम युजर्सना आपल्या अकाऊंटचं काय होणार याची चिंता सतावत आहे. थोड्या सोप्या शब्दांत हे समजून घेण्याचं प्रयत्न करुयात.
- जर पेटीएम बँकेत तुमचं खातं असेल तर नक्कीच ही थोडी चिंतेची बाब आहे. पण आरबीआयने ग्राहक कोणत्या अडचणीविना पेटीएम बँकेतून पैसे काढू शकतात हे स्पष्ट केलं आहे.
- याशिवाय तुम्ही पेटीएममधून फास्टटॅग रिचार्ज करु शकत नाही. असंही 31 जानेवारीपर्यंत तुम्ही केवायसी अपडेट केलं नसे तर तसंही Paytm FasTAG चा वापर करु शकला नसता.
- जर पेटीएम बँकेत एखादं ईएमआय किंवा स्टेटमेंड पेंडिंग असेल तर तुम्ही ते लवकर क्लिअर करुन घ्या.
- पेटीएम बँक खात्यात तुम्ही कोणताही व्यवहार करु शकणार नाही.
- ना तुम्ही टॉप अप करु शकता, ना तुम्ही गिफ्ट कार्ड पाठवू शकता. तुम्ही पेटीएम वॉलेट रिचार्जही करु शकत नाही.
- तुम्ही युपीआय पेमेंटसाठी याचा वापर करु शकता. पण यासाठी तुमचं खातं पेटीएम बँक नव्हे तर दुसऱ्या बँक खात्यात असलं पाहिजे.
नवे निर्बंध 29 फेब्रुवारीपर्यंत लागू होणार आहेत. यानंतर पेटीएम ग्राहक अकाऊंट, वॉलेट, प्रीपेड इंस्ट्रूमेंट्स, फास्टटॅग, NCMC कार्डमध्ये ना पैसे डिपॉझिट होतील, ना क्रेडिट व्यवहार होईल. पण ग्राहक त्यांच्या खात्यात असणारा बॅलेन्स संपेपर्यंत सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
29 फेब्रुवारी 2024 नंतर, पेटीएम वापरकर्त्यांना UPI आणि BBPOU (भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट) सारख्या सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा मिळणार नाहीत. मध्यवर्ती बँकेने PPBL ला 15 मार्च 2024 पर्यंत वेळ दिला आहे. या कालावधीत, सर्व प्रलंबित व्यवहार आणि नोडल खाती सेटल करावी लागतील.