हे आहेत व्हाॅट्स अॅपचे '३' नवे मजेशीर फीचर्स !

सर्वाधिक वापरला जाणारा मेसेंजिंग अॅप म्हणजे व्हाॅट्स अॅप.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 29, 2017, 11:01 PM IST
हे आहेत व्हाॅट्स अॅपचे  '३' नवे मजेशीर फीचर्स ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

नवी दिल्ली : सर्वाधिक वापरला जाणारा मेसेंजिंग अॅप म्हणजे व्हाॅट्स अॅप. सातत्याने नवनवीन बदल होणाऱ्या या अॅपमध्ये युजर्ससाठी कंपनीने अजून काही नवीन फीचर्स लाँच केले आहेत. जाणून घेऊया ते तीन फीचर्स. 

  • DP झूम करता येणार :

 

व्हाॅट्स अॅप मध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग काय असेल तर तो म्हणजे DP. इतरांचा DP बघण्यात आपल्या सगळ्यांच खूप रस असतो. मात्र हा DP आपण झूम करून पाहू शकत नाही. मात्र आता या नव्या फीचरमुळे ते शक्य होणार आहे. सध्या हे फीचर व्हाॅट्स अॅपच्या बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. परंतु, लवकरच हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. 

  • अनोळखी व्यक्तीचे नाव कळणार :

 

व्हाॅट्स अॅपवर एखाद्या अनोळखी व्यक्तीचा मेसेज आल्यास आपल्याकडे तो नंबर सेव्ह नसल्यामुळे त्या व्यक्तीचे नाव आपल्याला कळू शकत नाही. म्हणजेच आतापर्यंत नंबर सेव्ह नसलेल्या व्यक्तीचे नाव आपल्याला कळत नव्हते. पण लवकरच हे फीचर देखील युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एखाद्या अनोळखी व्यक्तीने मेसेज केल्यास नाव आपोआप रजिस्टर होईल आणि ते नाव तुम्हाला कळेल. 

  • स्टेटसची नवीन पद्धत :

आतापर्यंत व्हाॅट्स अॅप स्टेटस म्हणून युजर्स फोटो आणि GIF वापरू शकत होते. हे फीचर आता अधिक रंजक होणार आहे. या नव्या फीचरमुळे तुम्ही कलरफुल स्टेटस ठेऊ शकाल. याचा ऑप्शन तुम्हाला स्टेटसमध्ये उपलब्ध होईल. हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध असेल.