जगभरात Facebook, WhatsApp आणि Instagram डाऊन

जगभरात व्हॉट्स अॅप (WhatsApp) , फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) एक तासापेक्षा अधिक काळ डाऊन झाले होते.  

Updated: Mar 20, 2021, 07:30 AM IST
जगभरात Facebook, WhatsApp आणि Instagram डाऊन  title=

मुंबई : जगभरात व्हॉट्स अॅप (WhatsApp) , फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) एक तासापेक्षा अधिक काळ डाऊन झाले होते. काही तांत्रिक कारणामुळे बिघाड व्यत्यय आला होता. तासाभरानंतर ही सेवा पूर्वपदावर आली.जगभरात काल रात्री व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक भारतात आणि जगभरात अचानक डाऊन झाल्याने गोंधळ उडाला. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करण्यात बऱ्याच युजर्सना अडचणी येत होत्या. (WhatsApp, Facebook and Instagram are down)

काही यूजर्सना व्हॉट्सअॅप वेबवर लॉग इन करण्यात ही अडचण येत होती. रात्री 10.40 वाजल्यापासून जगभरात व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज करण्यात अडचण येत होती. एक तासापेक्षा अधिक काळ  तांत्रिक कारणांमुळे हे सगळे अॅप डाऊन होते. 

शुक्रवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याच्या बातम्या आल्या. दरम्यान फेसबुकही डाऊन झाले होते. हे तीन प्लॅटफॉर्म कार्यरत नसतानाही लोक ट्विटरवर आले आणि सर्व बाजूंनी मीम्सचा पूर आला. यादरम्यान, लोकांचा स्वत: चा आनंद लुटला. तथापि, व्हॉट्सअॅपबरोबरच थोड्या वेळाने इतर दोन्ही प्लॅटफॉर्मही व्यवस्थित काम करू लागले.

ट्विटरवर मीम्सचा पूर

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप ही फेसबुकची मालकी आहे. त्याचबरोबर ट्विटर ही त्याची प्रतिस्पर्धी कंपनी आहे. अशा परिस्थितीत ट्विटरवर लोकांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर थट्टा केली.