Whatsapp स्टेटस पाहताच होणार डाऊनलोड, वापरा ही एक ट्रिक

तुम्हाला आवडलेलं Whatsapp स्टेटस आता करता येणार डाऊनलोड, कसं ते वाचा सविस्तर

Updated: Sep 10, 2021, 09:04 PM IST
Whatsapp स्टेटस पाहताच होणार डाऊनलोड, वापरा ही एक ट्रिक title=

मुंबई: बऱ्याचदा आपल्याला स्टेटस आवडतात पण ते डाऊनलोड करता येत नाहीत. त्या स्टेटचे स्क्रिनशॉट मारून फोटो काढावे लागतात. युझर्सची हीच अडचण लक्षात घेऊन एक नवीन ट्रिक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या ट्रिकने तुम्ही तुमच्या लिस्टमधील जे Whatsapp स्टेटस आवडलं ते डाऊनलोड करू शकता. ही प्रक्रियाही खूप सोपी आहे. तुम्हाला त्यामुळे आता आवडलेलं स्टेटस सहज डाऊनलोड करता येणार आहे. 

आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपची खास ट्रिक सांगणार आहोत जी तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. ही युक्ती व्हॉट्सअॅपचं स्टेटस डाऊनलोड करायची आहे. Whatsaapp च्या स्टेटसवर फोटो-व्हिडीओ खूप सहजपणे डाउनलोड करू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅपची गरज भासणार नाही. 

Whatsapp स्टेटरवरील स्टोरी या 24 तासानंतर आपणच गायब होतात. इतकच नाही तर तुमच्याकडे जे फोननंबर्स आहेत त्यांच्याच स्टोरी तुम्ही पाहू शकणार आहात. आता तुम्हाला आवडलेली स्टोरी डाऊनलोड करायची असेल तर या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

पहिल्यांदा तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या फाइल मॅनेजरवर क्लिक करा.

-WhatsApp नावाच्या फोल्डरवर जा.

-तिथे तुम्हाला स्टेटस ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

-तुम्हाला व्हॉट्सअॅप स्टेटसवर दिसणारे फोटो आणि व्हिडिओ दिसतील.

-आता आपण डाउनलोड करायचा असलेला फोटो किंवा व्हिडीओ निवडा.

-आता तुम्हाला निवडलेला फोटो किंवा व्हिडीओवर क्लिक केल्यावर तुम्हाला डाऊनलोडचा पर्याय येईल

-या पर्यायावर क्लिक करा. डाऊनलोड झालेले फोटो आणि व्हिडीओ तुमच्या गॅलरीमध्ये दिसतील.