व्हॉट्सअॅपचे नवे फिचर ; मेसेज रेकॉर्ड करणे होईल सोपे

लोकप्रिय इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवीन फिचर सादर केले आहे. 

Updated: Apr 6, 2018, 03:53 PM IST
व्हॉट्सअॅपचे नवे फिचर ; मेसेज रेकॉर्ड करणे होईल सोपे title=

मुंबई : लोकप्रिय इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवीन फिचर सादर केले आहे. आता हे फिचर व्हॉट्सअॅप अॅनरॉईड अॅपच्या बीटा व्हर्जनमध्येही उपलब्ध आहे. नवीन फिचरच्या मदतीने तुम्ही व्हॉईस मेसेजच्या रेकॉर्डींगला लॉक करु शकाल. हे फिचर व्हॉट्सअॅपच्या आयफोन अॅपमध्ये सुरू केले आहे. या फिचरच्या माध्यमातून युजर्स व्हॉट्सअॅपवर मोठा व्हॉईस मेसेज कोणत्याही अडचणीशिवाय रेकॉर्ड करु शकाल. यासाठी तुम्हाला व्हॉईस रेकॉर्डींगवेळी सातत्याने रेकॉर्ड बटणवर बोट ठेवण्याची गरज नाही.

असा घ्या या सुविधेचा लाभ

त्याचबरोबर व्हाईस मेसेज पाठवण्यापूर्वी तुम्ही तो ऐकू शकाल, अशी सुविधा देण्यासाठी टीम काम करत आहे. या नवीन फिचर्समध्ये  व्हाईस मेसेज रेकॉर्ड करण्यासाठी माईक आयकॉन होल्ड करुन तो लॉक आयकॉनकडे स्वाईप करा. त्यानंतर होल्ड न करता हवा तेवढा मेसेज रेकॉर्ड करा. रेकॉर्डींग पूर्ण झाल्यावर सेंडवर क्लिक करा. लवकरच रेकॉर्डींग ऐकण्याची सुविधा उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

डिलीट करण्याची सुविधा

त्यानंतर कोणत्याही क्षणी तुम्ही कॅन्सलवर क्लिक करुन रेकॉर्डींग डिलीट करु शकाल. ही सुविधा मिळवण्यासाठी व्हॉट्सअॅप अॅनरॉईड बीटा अॅपवर 2.18.102 व्हर्जन डाऊनलोड करा. बीटा व्हर्जन गुगल प्ले वर उपलब्ध आहे.