मुंबई : व्हॉट्सअप, सर्वाधिक वापरलं जाणार आणि लोकप्रिय असलेलं अॅप. दररोजच्या विरंगुळ्यासाठी आणि ऑफीसच्या कामानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या व्हॉट्सअपचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. अनेकदा आपआपसात व्हॉट्सअप चॅटिंगमधून वाद होतात. अशा वेळेस अनेक जण पुरावा म्हणून चॅटचे स्क्रीनशॉट काढून ठेवतात. या स्क्रीनशॉटमुळे अनेकांची गोची होते. त्यामुळे या स्क्रीनशॉटवरुन अनेकांची चांगलीच पंचाईत होते. त्यामुळे या स्क्रीनशॉटच्या पर्यायावर बंदी टाकण्यात यावी, तसेच व्हॉट्सअपकडून या स्क्रीनशॉटबाबत कठोर भूमिका का घेत नाहीत, असा सवाल उपस्थित केला जातो. नेमकं या मागचं काय कारण आहे, याबाबत आपण जाणून घेऊयात. (why does WhatsApp not block Screenshot all users should know the reason)
WhatsApp कडून View Once नवं फिचर सादर करण्यात आलंय. त्यामध्ये चॅटिंगद्वारे पाठवलेल्या फोटो आणि व्हीडिओ एकदाच पाहता येईल. त्यानंतर फोटो आणि व्हीडिओ आपोआप डिलीट होईल. मात्र यामध्ये युझर्स View Once च्या मदतीने फोटो आणि व्हीडिओचं स्क्रीनशॉट काढता येतो. व्हॉट्सअपने यासंदर्भात डिटेक्शन फिचरही सादर केलं नाहीये.
व्हॉट्सअपच्या फीचर्सला ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo वेबसाईटने याबाबतच्या काही प्रश्नांची उत्तर दिले आहेत. WABetaInfo नुसार, व्हॉट्सअपने यूझर्सला प्रोटेक्ट करण्यासाठी हे पाऊल उचलले नाहीये.
WABetaInfo काय म्हटलंय?
WABetaInfo ने आपल्या वेबसाईटनुसार, व्हॉट्सअपने या आठवड्यात अँड्रोईडच्या बीटा व्हर्जनमध्ये View Once फिचर जोडलंय. त्यानुसार फोटो आणि व्हीडिओ एकदा पाहिल्यावर आपोआप डिलीट होईल. हे फीचर फार फायदेशीर आहे. पण फोटो आणि व्हीडिओचे स्क्रीनशॉट घेण्यावरुन काही युझर्सने आक्षेप नोंदवला आहे. यावर WABetaInfo ने स्पष्ट केलं की, व्हॉट्सअपने युझर्सचा सेफ्टीचा विचार करुनच स्क्रीनशॉट ब्लॉक करण्यासाठीचे फिचर देण्यात आलेलं नाही.
Why doesn’t WhatsApp block screenshots?
WhatsApp doesn't have a method to detect screenshots, for photos and videos sent using view once. We explain why in this article.https://t.co/S1UaIZ41uV
— WABetaInfo (@WABetaInfo) July 3, 2021
यूझर्सने फिचर्सचा अचूक वापर करावा
युझर्सनी या नव्या फिचर्सचा वापर अचूकपणे करावा. ज्यामुळे पेचात्मक प्रसंग उद्भवणार नाही. WABetaInfo नुसार, अँड्रोइड व्हॉट्सअपमध्ये वेगवेगळ्या अॅप्स किंवा अन्य माध्यमांचा वापर करुन स्क्रीनशॉट नोटिफिकेशनसह छेडछाड केली जाऊ शकते. परिणामी मेसेज पाठवणाऱ्याला समजणार ही नाही की, त्याने पाठवलेल्या फोटो किंवा व्हीडिओची रेकॉर्डिंग केली जाईल.
आपण पाठवलेले फोटो किंवा व्हीडिओ व्हॉट्सअप थर्ड पार्टी अॅपसह शेअर करणार नाही, अशी खात्री पटल्यावर युझर्स निर्धास्तपणे फोटो शेअर करतो. पण ते फोटो ज्याला पाठवतोय ती व्यक्ती दुसऱ्या मोबाईलनेच ते फोटो पाहू शकतो.
WABetaInfo नुसार, व्हॉट्सअप अशा प्रकारे युझर्सची माहिती लिक करणाऱ्या अॅप्सना ब्लॉक करणाचा मार्ग शोधू शकते. पण ज्या युझर्सना मेसेज प्राप्त होतायेत त्यांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. स्क्रीनशॉट डिटेक्शन फीचर सादर करण्याऐवजी व्हॉट्सअपने यूझर्सना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
संबंधित बातम्या :
Facebook पासवर्डसह डेटा चोरणारे हे 9 अॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का?
WhatsAppचे जबरदस्त फीचर, आता हाय क्वालिटी फोटो शेअर करणे शक्य