आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच चढवली गाडी

सर्व प्रकार cctv मध्ये कैद 

Updated: Sep 1, 2019, 08:17 AM IST
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच चढवली गाडी title=
संग्रहित छायाचित्र

अतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या अंगावर आरोपींनी थेट गाडी चढवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी कल्याणमध्ये घडली. यामध्ये हा पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण पश्चिम येथील संतोषी माता परिसरात बँकेवर दरोडा टाकण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती कल्याण पोलिसांच्या 'डीसीपी स्क्वाड'ला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला होता काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महिंद्रा टियूव्ही गाडीतून संशयित आरोपी संतोषी माता रोडवरील एचडीएफसी बँकेजवळ आले. त्याचवेळी 'डीसीपी स्क्वाड'मधील अमोल गोरे हे ती गाडी थांबवण्यासाठी त्यांच्यासमोर येऊन उभे ठाकले.

पोलीस समोर येताट आरोपींनी गाडी थांबवण्याऐवजी भरधाव वेगाने थेट गोरे यांच्या अंगावर नेली आणि तिथून पळ काढला. ही गाडी अक्षरशः गोरे यांच्या अंगावरून नेण्यात आल्याने ते यात जबर जखमी झाले. हा सर्व प्रकार cctv मध्ये कैद झाला आहे 

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर 'डीसीपी स्क्वाड'मधील इतर सहकाऱ्यांनी गोरे यांना तातडीने खासगी रुग्णालायत दाखल केले. या घटनेत गोरे याना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून पोलीस संबंधित आरोपींचा कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.