Washim Crime News : धावत्या ST बसमध्ये कंडक्टरनेच महिला प्रवाशाचा विनयभंग केला आहे. UP, बिहार नाही तर महाराष्ट्रात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसलांनी आरोपी कंडक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे एसटीबसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. वाशिम जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पीडित महिला रिसोड -वाशिम मार्गावर एसटी बसने प्रवास करत असताना तिला हा अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे. ज्या बसमधून ही महिला प्रवास करत होती. त्याच बसलच्या कंडक्टरने तिचा विनयंभग करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडितेने रिसोड पोलिस ठाण्यात तक्रार दाख केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी कंडक्टरला अटक केली आहे.
संजय पंढरी काळे असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी कंडक्टरचे नाव आहे. पीडित महिला वाशिम येथून रिसोड तालुक्यात असलेल्या गावात आपल्या माहेरी जाण्यासाठी बसमध्ये बसली होती. बसमध्ये गर्दी होती. त्यामुळे बस कंडक्टरने जागा देण्याच्या बहाण्याने विनय भंग केल्याचे पीडित महिले तक्रारीत म्हंटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करून कंडक्टर संजय पंढरी काळे याला अटक केली आहे. पुढील तपास रिसोड पोलीस करत आहेत.
डिलिवरी बॉयने जेवणाचे पार्सल दिल्यानंतर जबरदस्तीनं तरूणीचं चुंबन घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या येवलेवाडीतल्या नामांकित सोसायटीत घडलाय. 19 वर्षीय तरुणीनं कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला. रईस शेख असं आरोपीचं नाव आहे. रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पार्सल दिल्यानंतर आरोपीनं तरुणीकडे पिण्यालाठी पाणी मागितलं. पाणी प्यायल्यानंतर आरोपीनं तरुणीला जवळ ओढून बळजबरीनं दोन वेळा चुंबन घेतलं. तरुणीनं लगेचंच पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरोधात तक्रार दिली.
काही महिन्यांपीर्वी पिंपरी चिंचवडमध्ये वाकड परिसरात एक अशीच एक धक्कादायर घटना घडली होती. तरुणीचा फूड डिलिव्हरी बॉयनं विनयभंग केला होता. भर रस्त्यात तरुणीला मिठी मारुन त्यानं तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. रात्री पीडित तरुणी भावासोबत चायनीजचा गाडा बंद करुन घरी जात होती. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयनं अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर बळजबरीनं तरुणीला मिठी मारुन चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.