विदर्भात पावसाचा जोर वाढणार

नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा 

Updated: Aug 26, 2018, 09:46 PM IST
विदर्भात पावसाचा जोर वाढणार title=

नागपूर: पूर्व-भारतात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व विदर्भात २७ आणि २८ ऑगस्टला पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

यामुळे या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते. ज्यामुळे काही गावांचा संपर्कही तुटू शकतो. 

या पार्श्वभूमीवर नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. तर नागपूर, वर्धा, अमरावती, नांदेड, हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात हलक्या पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचं नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.