Samsung मोबाईलचा स्फोट! खिसा जळाला, मांडी भाजली... धक्कादायक घटना समोर

मोबाईलचा अतिवापर करणाऱ्यांनो सावधान, वेळीच व्हा सावध!

Updated: Jan 4, 2023, 02:09 AM IST
Samsung मोबाईलचा स्फोट! खिसा जळाला, मांडी भाजली... धक्कादायक घटना समोर    title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : मोबाईल हे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, हेच मोबाईल आता धोकादायक बनले आहेत. चंद्रपुर मध्ये Samsung मोबाईलचा स्फोट झाला आहे. यात एका व्यक्ती जखमी झाला आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात हा प्रकार घडला.  ग्राहकाच्या खिशात असलेल्या मोबाईलमधून अचानक धूर येऊ लागला. यामुळे संबधित व्यक्तीने मोबाईल बाहेर काढला आणि आग लागली.  भाऊराव आस्वले यांच्या सह हा प्रकार घडला.  भाऊसाहेब यांनी चार वर्षांपूर्वी हा मोबाईल  खरेदी केला होता. 

या घटनेत धूर व आगीमुळे आस्वले यांची पॅन्ट जळून मांडीला इजा झाली आहे. मोबाईल गरम होत होता.  स्फोटामागे नेमके कारण समोर आलेले नाही.  अचानक झालेल्या या प्रकाराने भाऊराव अस्वले यांना धक्का बसला आहे.