आम्ही कोणाचेही कायमचे दुश्मन नाही- अजित पवार

कालच हे दोन्ही नेते एका लग्नसमारंभात एकत्र दिसले होते.

Updated: Dec 9, 2019, 11:37 AM IST
आम्ही कोणाचेही कायमचे दुश्मन नाही- अजित पवार title=

बारामती: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या जवळकीच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. कालच हे दोन्ही नेते करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात एकत्र आले होते. यानंतर अजित पवार यांनी सोमवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आणखी एक सूचक वक्तव्य केले. 

आम्ही काय कोणाचे कायमचे दुश्मन नसतो. त्यामुळे विरोधक किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते समोरासमोर आल्यानंतर एकमेकांना नमस्कार करतात, चर्चा होते. संजय शिंदे यांनी आग्रह करून मला लग्नाला बोलावले. त्यांनी लग्नात आमच्या खुर्च्या अशा ठेवल्या की, मी आणि देवेंद्रजी बाजूबाजूला आलो. त्यामुळे थोडीफार आम्ही इकडची तिकडची चर्चा केल्याचे अजित पवार यांनी म्हटले. 

अजित पवार म्हणाले होते, मी काकांशी बोललोय; फडणवीसांचा खुलासा

त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये अजूनही काही गुफ्तगू सुरु आहे, का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यापूर्वी 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेसाठी अजित पवार यांनीच माझ्याशी संपर्क साधल्याचे म्हटले होते. शिवसेना आणि काँग्रेससोबत आम्ही सरकार चालवू शकत नाही. त्यामुळे आपण एकत्र येऊन सरकार स्थापन करू. मी या गोष्टीची कल्पना शरद पवार यांना दिली आहे, असा दावा त्यावेळी अजित पवारांनी केल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. 

'मी पुन्हा येईन' हा माझा गर्व नव्हता- देवेंद्र फडणवीस