लठ्ठ म्हणून नवऱ्याने नाकारलं, आता संघर्षानंतर ६ वर्षाच्या मुलाची आई 'फिटनेस चॅम्प'

'तू लठ्ठ आहेस आणि त्यामुळेच मला तुझ्यासोबत राहण्यास कोणताही रस नाही', असं सांगत नवऱ्याने

Updated: Sep 28, 2018, 07:59 PM IST
लठ्ठ म्हणून नवऱ्याने नाकारलं, आता संघर्षानंतर ६ वर्षाच्या मुलाची आई 'फिटनेस चॅम्प'

चेन्नई : 'तू लठ्ठ आहेस आणि त्यामुळेच मला तुझ्यासोबत राहण्यास कोणताही रस नाही', असं सांगत नवऱ्याने या ६ वर्षाच्या आईला झिडकारलं. यानंतर रूबी यांनी शारिरिक आणि मानसिक परिस्थितीला साथ देत, रनिंग आणि व्यायाम करून सतत वजन कमी करण्यावर भर दिला. अनेकांनी तुझ्याकडून हे शक्य नाही असं सांगितलं, पण आपल्या ६ वर्षाच्या मुलाचा सांभाळ करत, रूबी यांनी बॉडीबिल्डिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावरील मेडल पटकावलं आहे.

champ_newअर्थातच रूबीला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतोय. आपल्या मुलाला सांभाळत, बॉडी बिल्डिंगसाठी व्यायाम करणे, आहार सांभाळणे, यासाठी खर्च करणे तिला सतत संघर्ष करायला लावतंय.

पण रूबी यांची आता यशस्वी घौडदौड सुरू झाली आहे. नवऱ्याने लठ्ठ म्हटल्यानंतर व्यायाम आणि रनिंग करत रूबीने मोठ्या प्रमाणात वजन कमी केलं, पैशांची चणचण सतत भासत होती, म्हणून झुंबा डान्स क्लास घेण्यास सुरूवात केली.

गुवाहाटीत झालेल्या मिस फिटनेस चॅम्पियन बॉडीबिल़्डिंग स्पर्धेत तिने मेडल पटकावलंय. तर आता चेन्नईत क्राऊन जिंकलाय. रूबी यांनी आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर हे केलंय, असं तिचे कोच सांगतात.

chamap_three