वयाच्या चाळीशीनंतर महिलांनी असं रहावं फीट आणि हेल्दी!

जर चाळीशीनंतर तुमचं वजन सतत वाढत असेल तर तुम्ही या सोप्या उपायांनी ते कमी करू शकता.

Updated: Dec 25, 2021, 11:24 AM IST
वयाच्या चाळीशीनंतर महिलांनी असं रहावं फीट आणि हेल्दी! title=

मुंबई : वयाची 40शी ओलांडली की अनेक आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं लागतं. अशा वयामध्ये अनेक आजार मागे लागतात. यामध्ये मुख्य म्हणजे वजन वाढीची समस्या अनेकांना जाणवते. जर तुमचं वय 40 पेक्षा जास्त असेल, तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं वजन सहज वाढू शकतं आणि ते कमी करणे तुमच्यासाठी कठीण काम आहे.

तुमची कामं, खाण्याच्या सवयी, हार्मोन्स आणि तुमचं शरीर चरबी कशा प्रकारे साठवते यातील बदल हे सर्व वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. जर चाळीशीनंतर तुमचं वजन सतत वाढत असेल तर तुम्ही या सोप्या उपायांनी ते कमी करू शकता.

आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश

आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश केला पाहिजे. हे पदार्थ मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि धान्यांपेक्षा अधिक पोषक असताना आणि यामुळे कमी चरबी तसंच कॅलरी शरीरात जाते. याशिवाय हे पदार्थ तुम्हाला पोट भरण्यास आणि तुमची भूक भागवण्यास मदत करतात. 

नाश्ता करणं टाळू नका

तज्ज्ञांचं मत आहे की, लोकांनी नाश्त्यामध्ये ओट्स किंवा संपूर्ण धान्यांचे टोस्ट, फळे खावीत. यामुळे तुमच्या दिवसभराची भूक शांत करते. मुख्य म्हणजे नाश्ता करणं टाळू नका.

रात्रीच्या वेळी कमी खावं

जर तुम्ही दुपारी 3 वाजता जेवणात रोजच्या कॅलरीज घेतल्या तर तुम्ही तुमचं वजन सहज कमी करू शकता. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कधी खायचं आहे आणि कधी नाही हे माहित असलं पाहिजे.

सोडायुक्त पेयांपासून दूर रहा

जर तुम्ही साखरयुक्त कॉफी, चहा, सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स पित असाल तर त्याऐवजी पाणी कॅलरी नसलेली पेयं पिण्यास सुरुवात करता. तुमच्या आवडत्या पेयामध्ये भरपूर साखर मिसळलेली असते ज्यामुळे तुमचे वजन वाढतं आणि तुमला डायबेटीजचा धोकाही वाढतो.

व्यायामासाठी वेळ काढा

डेस्क जॉब तसंच प्रवास यामध्ये अनेकांना वर्कआउटसाठी वेळ मिळत नाही. मात्र वेळ काढून तुम्ही दर आठवड्याला किमान अडीच तास मध्यम शारिरीक हालचाली कराव्यात, ज्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहाल.

ताण घेऊ नका

तणावामुळे तुम्ही योग्य आहार घेऊ शकत नाही. त्यामुळे योग, दीर्घ श्वास, ध्यान किंवा वाचन करा. तणावमुक्ती प्रत्येकासाठी वेगळी असू शकते, त्यामुळे तुमच्यासाठी काय फायदेशीर आहे ते शोधा.