Union Budget 2024 for Women : आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतुद करण्यात आल्या आहे. दरम्यान गेल्या वर्षी 2023 च्या अर्थसंकल्पात देशातील महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर करण्यात आली होती. या एकवेळ बचत योजनेत महिलांना 7.5 टक्के व्याज दिलं जातंय. यंदाच्या ही अर्थसंकल्पात महिला सशक्तीकरणावर सरकार भर देणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी संसदेत दिली.
गेल्या 10 वर्षांत महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचले असून तिहेरी तलाक प्रथा बंद करण्याचा मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय होता. पीएम आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात 70 टक्के महिलांना घरं मिळाली असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी दिली. तसेच 3 कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प मत्स्य संपदा योजना लागू करून 55 लाख लोकांना रोजगार दिला. आता नवीन आर्थिक वर्षात 5 इंटीग्रेटेड पार्क स्थापित केले जातील. आतापर्यंत 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत. नवीन आर्थिक वर्षात 3 कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.
यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचायचे आहे. खास जमातींसाठी खास योजना आणली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सरकार गरिबी हटवण्याचे काम करत असून सरकारने आव्हानांचा धैर्याने सामना केला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. पाणी योजनेतून प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा केला जात आहे. 78 लाख पथारी व्यावसायिकांना मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
11.8 कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरुणांच्या सक्षमीकरणावरही काम केले आहे. तीन हजार नवीन आयटीआय उघडण्यात आल्या आहेत. 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे.