मुंबई : वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत, वजन कमी करण्यासाठी अनेक वेळा कठीण डायट, आणि व्यायाम केले जातात, तसेच आहारात देखील बदल केले जातात, अनेक वेळा काय खायचं आणि नाही खायचं असा प्रश्न पडतो, आणि डायटची वाट लागते आणि वजन पुन्हा वाढता वाढता वाढे वाढत जातं.
यावर एक चांगला उपाय आहे, तसा उपाय अतिशय साधा सोपा आहे, गरज आहे फक्त सातत्याची आणि संयम ठेवण्याची. हा प्रयोग तुमचा वर्षभर तरी चालणार आहे, या दरम्यान शरीराला कोणताही अपाय न होता, तुमचं वजन कमी होत जाणार आहे, हा तुम्हाला निश्चितच आश्यर्याचा धक्का असणार आहे.
ग्लासभर पाण्यात चार बोटांवर बसतील एवढ्या ओवा रोज रात्री टाका, सकाळी उठल्यावर हे पाणी प्या, प्यायला जड जात असल्याचं थोडं सैंदव मीठ टाका, हे नियमित करा, बाहेरगावी प्रवासाला गेलात तरी रात्री बाटलीत ओवा टाका, सकाळी शक्य झाल्यास हे पाणी कोमट करा आणि प्या.
तुमची शरीराची चयापचय क्षमता यानंतर प्रचंड वाढेल, नेहमीपेक्षा जास्त भूक तुम्हाला लागेल, इतर अपचानाचे त्रास कमी होतील, आणि तुमचं वजन झटपट उतरण्यास सुरूवात झाली असेल, फक्त सातत्य सोडू नका.