Rishi Sunak: 'हिंदूंमध्ये 'धर्म' संकल्पनेचा अर्थ...' इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक नक्की काय म्हणाले...

मागच्याच वर्षी लिझ ट्रस आणि ऋषी सुनक यांच्यामध्ये राजकीय चुरस होती. पंतप्रधान पदासाठी या दोघांचीही उमेदवारी तगडी होती. 

Updated: Feb 4, 2023, 06:43 PM IST
Rishi Sunak: 'हिंदूंमध्ये 'धर्म' संकल्पनेचा अर्थ...' इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक नक्की काय म्हणाले...

Rushi Sunak: ब्रिटनमध्ये सध्या अनेक आर्थिक प्रश्न डोकं वर काढत आहेत. गेल्याच वर्षी भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान जे आधी अर्थमंत्री होते, त्यांच्यापुढेही अशी अनेक आव्हानं आहेत. ऋषी सुनक हे भारतीय उद्योगपती आणि इन्फोसेसचे सर्वसर्वा नारायण मुर्ती यांचे जावई आहेत. ऋषी ब्रिटनचे पंतप्रधान होऊन आज 100 दिवस पुर्ण जाले आहेक. त्यानिमित्तानं पियर्स मॉर्गन यांना त्यांनी मुलाखत दिली त्यावेळी त्यांनी अनेक मु्द्द्यावर भाष्य करत आपली भुमिकाही स्पष्ट केली आहे. 

गेल्या निवडणुकीत लिझ ट्रस यांच्याकडून माझा पराभव झाल्यानंतर मी निराश झालो होतो. या पराभवानंतर माझी राजकीय कारकीर्द संपली असं मला वाटतं होतं, अशी प्रतिक्रिया नुकतीच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मांडली आहे. अशा त्यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला पुन्हा निवडणूक लढण्याची प्रेरणा कशी मिळाली असा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितले की, हिंदूंमध्ये 'धर्म' नावाची एक संकल्पना आहे. त्याचा अर्थ 'कर्तव्य' असा होतो. कोणतंही काम प्रामाणिकपणे करणं हे आपलं कर्तव्य आहे. लहानपणापासून माझ्यावरही हेच संस्कार झाले आहेत. एकंदरीच आपल्याकडून अपेक्षित असलेलं काम हे प्रामाणिकपणे करणं त्यालाच 'धर्म' असं म्हणतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

गेल्या 100 दिवसांमध्ये पंतप्रधान म्हणून अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. आमच्या सरकारपुढे सध्या खूप आव्हानं आहेत. मला खात्री आहे की, आम्ही ही आव्हानं पार करू शकतो. जनतेची सेवा करणं हेच आमचं कर्तव्य आहे. आम्ही देशात बदल घडवून आणू शकतो. असा आम्हाला विश्वास आहे असंही ते म्हणाले आहेत.  

मागच्याच वर्षी लिझ ट्रस आणि ऋषी सुनक यांच्यामध्ये राजकीय चुरस होती. पंतप्रधान पदासाठी या दोघांचीही उमेदवारी तगडी होती. अर्थमंत्री असताना ऋषी सुनक यांनी ब्रिटनची अर्थव्यवस्था सुधारण्यात खारीचा वाटा होता. परंतु ऋषी सुनक यांच्यापुढे अनेक आव्हानंही होती. इंग्लंडमधील वर्णभेद हेदेखील ऋषी सुनक यांच्यापुढील आव्हानं होतं. पहिल्या निवडणुकांमध्ये ऋषी सुनक यांचा पराभव झाला आणि लिझ ट्रस या पंतप्रधान पदावर आल्या पण त्यानंतर जेव्हा लिझ ट्रस यांच्या काही वादग्रस्त राजकीय घोटाळ्यांमुळे लिस ट्रस यांचे पंतप्रधानपद गेले आणि त्यांच्या जागी उमेदवार ऋषी सुनक यांचा पंतप्रधानाचा मार्ग खुला झाला आणि ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले. परंतु अद्यापही त्यांच्यासमोरील आव्हानं काही संपलेली नाहीत.