नवी दिल्ली : साहस म्हणून कित्येक जण वेडं धाडस करतात. काहीतरी रोमांचकारी करायचं म्हणून अनेक जण आपल्या जीव पणाला लावताना दिसतात. कुणी उंचच उंच टेकड्यांवर ट्रेकिंग करायला जातं, कुणी रिव्हर राफ्टिंग तर कुणी स्कुबा डायव्हिंग... आपल्या आयुष्यात थोडं थ्रिल हवंय म्हणून कुणी काय करेल याचा नेम नाही... याच दरम्यान सोशल मीडियावर असंच एक वेड्या धाडसाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 'वेडं धाडस' यासाठी म्हणतोय कारण एखाद्या गोष्ट करताना ती आपल्या जीवावर तर बेतणार नाही ना? याची काळजी घेणं आवष्यक असतं... कारण 'जान है तो जहान है!' नाही का...
हा व्हिडिओ एका बंजी जंपिंग करणाऱ्या तरुणाचा आहे... पायाला दोरी बांधून क्रेनच्या साहाय्यानं वर जाऊन स्वत:ला खाली झोकून देणं... होय थ्रील तर नक्कीच आहे यात... पण, आपल्या जीवाला यात धोका तर नाही? आपणं सुरक्षेची सगळ्या गोष्टी तपासल्या आहेत का? हे ध्यानात घेणं गरजेचं आहे.
या तरुणानं आणि त्याच्या टीमनं मात्र सुरक्षेकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय. हा तरुणं बंजी जंपिंगसाठी तब्बल ९२ मीटर उंचीवर गेला... तिथून त्यानं पायाला दोरी बांधून खाली उडी तर घेतली... परंतु, खाली पोहचण्याआधीच त्याच्या पायाची दोरी सुटली... आणि क्षणभर खाली उभ्या असणाऱ्या बघ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
हा तरुण धाडकन खाली कोसळला परंतु, खाली सेफ्टी कुशन असल्यानं तो त्यावर आदळला... या सेफ्टी कुशनमुळे तो खाली आल्यानंतर पुन्हा एकदा हवेत उडाला आणि पुन्हा खाली पडला. या घटनेत तरुणाच्या पाठीच्या कण्याला मोठी दुखापत झालीय.
हा व्हिडिओ थोड्याच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला. उपस्थितांच्या म्हणण्यानुसार, या तरुणानं बंजी जंपिंग करण्याअगोदर नशा केली होती.