Russia China Lunar Base : अमेरिका 54 वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करणार आहे. मानवी मोहिम राबवण्याआधी अमेरिका पेरेग्रिन (Peregrine) नावाचे यान चंद्रावर पाठवणार आहे. 24 डिसेंबरला हे यान चंद्राच्या दिशेने झेप घेणार आहे. 26 जानेवारी रोजी हे यान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. अमेरिकन अंतराळ संस्था (NASA) च्या या मोहिमेला टक्कर देण्यासाठी चीन आणि रशियाने मास्टरल प्लान बनवला आहे. 2030 पर्यंत चंद्रावर मानवी वसाहत निर्माण करण्याचे चीन आणि रशियाचे टार्गेट आहे.
चीन आणि रशिया संयुक्त मोहिम राबवणार आहे. 2030 पर्यंत चंद्रावर बेस कॅम्प उभारण्याचे चीन आणि रशियाचे टार्गेट आहे. रशियाने चीनसोबत चंद्रावर 'नो लिमिट' भागीदारीला मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी चीन आणि रशिया यांच्यात चंद्रावर बेस कॅम्प उभारण्याबाबत करार झाला आहे. तर, दुसरीकडे 2030 पर्यंत मानवी अंतराळ मोहिम राबवण्याची नासाची योजना आहे. ग्लोबल टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
2030 पर्यंत चंद्रावर मानवी वसाहत निर्माण करण्याची चीन आणि रशियाची योजना आहे. तीन टप्प्यात टीन आणि रशिया ही योजना राबवणार आहे. सर्व प्रथम चंद्रावर बेस कॅम्प उभारण्यासाठी दोन्ही देश संयुक्तपणे चंद्रावरील जागेची निवड करतील. यानंतर दुसऱ्या टप्प्यात या जागेवर एक कंट्रोल रुम उभारला जाईल. या कंट्रोल रुमच्या मदतीने कार्गो डिलिव्हरी सुरू केली जाणार आहे. वीज, वाहतूक आणि दळणवळण यासाठी कंट्रोल रुममध्ये मॉड्यूल स्थापित केले जाणार आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात मॉड्युलच्या मदतीने मानवाला मानावाला चंद्रावर पोहचवले जाणार आहे. संयुक्त प्रकल्पाच्या माध्यमातून चीन आणि रशिया अंतराळातही आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारत अंतराळ क्षेत्रातली महापॉवर बनली आहे. अमेरिका आणि रशियानंतर चांद्रमोहीम फत्ते करणारा चीन हा तिसरा देश ठरला. 2019 साली चीनचं यान चंद्रावर उतरलं. भारताची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी ठरली. चंद्रावर उतरणारा भारत हा जगातला चौथा देश ठरणार आहे. भारताचे चांद्रयान 3 चंद्रावर लँड करण्याआधीच काही दिवसांपूर्वीच रशिया स्पेस एजन्सीचं लुना 25 हे अंतराळ यान चंद्रावर क्रॅश झालं. आता रशिया चीनच्या मदतीने थेट चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करणार आहे.