"देव तारी त्याला कोण मारी'' व्हेलच्या तोंडात 30 सेकंद राहूनही हा माणूस जिवंत

मृत्यूशी झुंज देत तो व्हेलच्या तोंडातून परत आला आहे.

Updated: Jun 13, 2021, 07:54 PM IST
"देव तारी त्याला कोण मारी'' व्हेलच्या तोंडात 30 सेकंद राहूनही हा माणूस जिवंत

लंडन : तुम्ही "देव तारी त्याला कोण मारी'' ही म्हण ऐकली असणार, पंरतु अमेरिक्तील एका माणसाने ते अनुभवले देखील आहे. अमेरिकेतील हा माणूस व्हेल माशाच्या तोंडातून जिवंत बाहेर आला आहे.  हा माणूस सुमारे 30 सेकंद व्हेलच्या तोंडात राहिला आणि त्यानंतर जिवंत बाहेर आले. त्याने व्हेल माशाच्या तोंडात गेल्यावर जवळजवळ त्याचा मृत्यू पाहिला होता. परंतु त्याचं नशीब इतक चांगलं की, तो जिवंत बाहेर आला. ही घटना अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्सॉमधील आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीला व्हेलच्या तोंडातील दात लागल्यामुळे जखमाही झाल्या आहेत. त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्सॉमधील आहे.

मायकल पॅकर्ड असे या 56 वर्षे व्यक्तीचे नाव आहे. मृत्यूशी झुंज देत तो व्हेलच्या तोंडातून परत आला आहे. मायकेल पॅकार्ड लॉबस्टर डायव्हर आहे. तो हे काम गेल्या 40 वर्षांपासून करत आहे. मायकेल समुद्रातून विविध प्रकारचे प्राणी पकडून बाजारात विकतो.

मायकलने सांगितले की, तो शुक्रवारी नेहमीप्रमाणेच सकाळी हॅरिंग कोव्ह बीच येथे गेला आणि समुद्रात पोहताना तो 35 फूट खोलीपर्यंत गेला. या दरम्यान त्याला व्हेलने गिळले. त्याला अचानक धक्का बसल्यासारखे झाले. त्यानंतर, त्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण अंधार झाला. तो हलू देखील शकला नव्हता, त्यावेळेस त्याला काय करावे हे सुचत नव्हते.

मायकलने सांगितले की, पहिले त्याला वाटले की, त्याच्यावर शर्कने हल्ला केला आहे. त्यामुळे त्याला हे कळून चुकले की, तो आता जिवंत राहू शकत नाही. त्याने आपल्या पत्नीला आणि मुसांना आठवले. पण नंतर त्याला कळले की, त्याला जास्त लागलेले नाही. त्यामुळे तो शार्क तर नसणार. मग त्याने धैर्य गमावले नाही आणि व्हेल माशाच्या तोंडातून बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू केला.

त्याने सांगितले की, व्हेल माशाने डोके हलवण्यास सुरवात केली. मग त्याला एका ठिकाणी प्रकाश दिसला आणि दुसर्‍याच क्षणी तो समुद्रात होता. कारण व्हेलने स्वत: त्याला तोंडातून बाहेर फेकले. तो व्हेल फिशच्या तोंडात सुमारे 30 सेकंद राहिला होता. मायकलचा मित्र  जोशिय्याह बाहेर जहाजात होता, त्याने मग मायकलला वर खेचले आणि पाण्याबहेर काढले.

मायकलचा जिव वाचला आहे परंतु त्याला व्हेलच्या तोंडात इजा झाली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करावे लागले.