Viral Video: कॅमेऱ्यात कैद झाला लाईव्ह मृत्यू, 50 फुटांवर Acrobat परफॉर्म करत असतानाच पत्नीला पायात पकडताना अंदाज चुकला अन्...

China Circusi Viral Video: चीनमध्ये लाईव्ह परफॉर्म करत असताना उंचावरुन खाली पडल्याने महिला कलाकाराचा मृत्यू झाला आहे. महिला आपल्या पतीसोबत परफॉर्म करत होती. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 21, 2023, 11:35 AM IST
Viral Video: कॅमेऱ्यात कैद झाला लाईव्ह मृत्यू, 50 फुटांवर Acrobat परफॉर्म करत असतानाच पत्नीला पायात पकडताना अंदाज चुकला अन्... title=

China Circus Viral Video: चीनमध्ये (China) मंचावर लाईव्ह परफॉर्म करत असतानाच उंचावरुन खाली पडून एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. अॅक्रोबॅट (acrobat) असणारी ही महिला मंचावर आपल्या पतीसह Trapeze परफॉर्म करत होती. यावेळी तब्बल 45 ते 50 फुटांवरुन महिला खाली पडली आणि ठार झाली. मृत्यूचा हा थरार कॅमेऱ्यात लाईव्ह कैद झाला आहे. ट्विटरला अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. अनहुई प्रांतात ही घटना घडली आहे. 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जीमनॅस्ट असणारी महिला आपल्या पतीसह मंचावर परफॉर्म करताना दिसत आहे. दोघेही परफॉर्म करण्यासाठी उंचावर जाताच काही वेळात दुर्घटना घडते. 

स्टंट करत असताना पती पायामध्ये पत्नीला पकडण्यात अपयशी ठरतो आणि महिला थेट खाली येऊन कोसळते. दुर्घटना घडते तेव्हा दोघेही 45 ते 50 फूट उंचावर होते. इतक्या उंचावरुन खाली पडल्याने महिला जखमी झाली होती. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण गंभीर जखमी असल्याने तिचा मृत्यू होता. अधिकाऱ्यांनी याप्ररणी तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे. 

बीबीसीने एका चिनी प्रसारमाध्यमाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं नाव सन आणि पतीचं नाव झँग आहे. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र परफॉर्म करत होते. तसंच उपस्थितांवर आपली छाप पाडण्याच्या हेतूने ते अनेकदा सेफ्टी बेल्टशिवाय स्टंट करायचे.