पंतप्रधानांचा अमेरिका दौरा, मोदी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची घेणार भेट

अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (President Joe Biden) 24 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (Prime Minister Narendra Modi) द्विपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

Updated: Sep 21, 2021, 05:55 PM IST
पंतप्रधानांचा अमेरिका दौरा, मोदी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची घेणार भेट
प्रातिनिधिक छायाचित्र

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांची 24 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये (White House) द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधील अंतर्गत संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये या बैठकीबाबत सांगण्यात आलं आहे. बायडन राष्ट्राध्यक्ष  झाल्यानंतरची मोदी यांची ही पहिलीच भेट असणार आहे. (america president joe biden hold meeting with india prime minister narendra modi in white house on friday)

कमला हॅरिस मोदींच्या भेटीला 

जो बायडन यांच्या बैठकीआधी 23 सप्टेंबरला अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हैरिस (US Vice President Kamala Harris)  मोदींची भेट घेणार आहे. मोदी आणि बायडेन यांच्यात याआधी अनेकदा व्हीडिओ कॉन्फरन्सिद्वारे चर्चा झाली आहे.

मोदी 2019 मध्ये अमेरिकेचा दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी  माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump) यांच्या सोबत 'हाउडी- मोदी' (Howdy Modi) हा कार्यक्रमला उपस्थित राहिले होते.  

व्हाईट हाऊसनुसार, शुक्रवारी जो बायडेन हे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा (Yoshihide Suga) यांचीही भेट घेणार आहे. साप्ताहिक कार्यक्रमनुसार, बायडेन हे मोदी, सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसनयांच्या (Scott Morrison) सोबत व्हाईट हाऊसमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. यामध्ये अफगाणिस्तान, कोरोना संकट, हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होतील.

तसेच पहिल्यांदाच जो बायडेन क्वॅाड (QUAD) शिखर संमेलनाचं यजमानपद भूषवणार आहेत. मोदी सहा महिन्यानंतर परदेश दौरा करणार आहेत. पण मोदी कोव्हिड काळात दुसऱ्या परदेश दौऱ्याला जाणार आहेत. याआधी मार्चमध्ये मोदींनी बांग्लादेश दौरा केला होता.